Stock Market : भारती एअरटेलकडून नवी ऑर्डर, या स्टॉकने 10 महिन्यात दिलाय 1610% तगडा परतावा

गुंतवणुकीसाठी तुम्ही चांगला स्टॉक शोधत असाल तर बोंडाडा इंजिनिअरिंग लिमिटेडच्या शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना कमी कालावधीत दमदार परतावा दिला आहे. कंपनीला अलीकडेच टेलीकॉम कंपनी भारती एअरटेलकडून नवीन ऑर्डरही मिळाली आहे.
Stock Market
Stock Marketsakal
Updated on

गुंतवणुकीसाठी तुम्ही चांगला स्टॉक शोधत असाल तर बोंडाडा इंजिनिअरिंग लिमिटेडच्या शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना कमी कालावधीत दमदार परतावा दिला आहे. कंपनीला अलीकडेच टेलीकॉम कंपनी भारती एअरटेलकडून नवीन ऑर्डरही मिळाली आहे. नुकतेच कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्के अपर सर्किट लागले. सध्या हा शेअर बीएसईवर 2558.60 रुपयांवर ट्रेड करत आहे. या वाढीसह कंपनीचे मार्केट कॅप 5,527.10 कोटी झाले आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2,558.60 आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 142.50 रुपये आहे.

बोंदाडा इंजिनिअरिंगला भारती एअरटेलकडून 2.05 कोटीची नवीन वर्क ऑर्डर मिळाली आहे. या अंतर्गत, कंपनीला 6 मीटर उंचीचा आणि 60 किलो वजनाचा (हॉट डिप्ड गॅल्वनाइज्ड) GI पोल बेसशिवाय पुरवायचा आहे. कंपनीकडे जानेवारी 2024 पर्यंत 1600 कोटींहून अधिकची ऑर्डर बुक आहे. ही वर्क ऑर्डर खवरा, गुजरातमध्ये 600MW ग्रिड कनेक्टेड सोलर पॉवर प्रकल्पाच्या उभारणीसाठी बॅलन्स ऑफ सिस्टीम कामासाठी आहे. यामध्ये SCOD नंतर 3 वर्षांसाठी ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स देखील समाविष्ट आहे.

बोंदाडा इंजिनीअरिंगने नुकतेच त्यांचे दमदार निकाल जाहीर केला आहे. कंपनीचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष 2023 मधील 16.8 कोटीवरून आर्थिक वर्ष 2024 मध्ये 44.72 कोटीपर्यंत वाढला आहे. याशिवाय, कंपनीचा महसूल आर्थिक वर्ष 23 मधील 371 कोटीवरून आर्थिक वर्ष 2024 मध्ये 801 कोटी झाला आहे. एकट्या बोंदाडा इंजिनिअरिंगच्या शेअर्समध्ये 40 टक्के वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत स्टॉकने 536 टक्के मजबूत परतावा दिला आहे. या वर्षात कंपनीचे शेअर्स आतापर्यंत 513 टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या 10 महिन्यांत, गुंतवणूकदारांना 1610 टक्के इतका जबरदस्त परतावा मिळाला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.