Share Market Closing: शेअर बाजार किंचित वाढीसह बंद, मिडकॅप स्मॉलकॅप शेअर्स चमकले

Share Market Closing: शेअर बाजारात पुन्हा एकदा प्रॉफिट बुकींग झाली. चांगली सुरुवात केल्यानंतर अखेर शेअर बाजार किंचित वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स 63 अंकांच्या किंचित वाढीसह 71,721 वर बंद झाला. निफ्टीनेही 28 अंकांची उसळी घेतली आणि 21,647 वर बंद झाला.
Nifty 50, Sensex end in the green for third consecutive day; smallcap index hits record high
Nifty 50, Sensex end in the green for third consecutive day; smallcap index hits record high Sakal
Updated on

Share Market Closing Latest Update 11 January 2024: शेअर बाजारात पुन्हा एकदा प्रॉफिट बुकींग झाली. चांगली सुरुवात केल्यानंतर अखेर शेअर बाजार किंचित वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स 63 अंकांच्या किंचित वाढीसह 71,721 वर बंद झाला. निफ्टीनेही 28 अंकांची उसळी घेतली आणि 21,647 वर बंद झाला.

ऑटो, ऑइल आणि गॅस आणि कंझ्युमर ड्युरेबल क्षेत्रात सर्वाधिक खरेदी झाली. तर एफएमसीजी, फार्मा आणि रियल्टी क्षेत्रात विक्री झाली.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

निफ्टी आयटी निर्देशांकात 0.33 टक्क्यांची घसरण झाली तर निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी बँक वाढीसह बंद झाले. HDFC AMC चे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले. कंपनीच्या नफ्यात 32 टक्क्यांनी वाढ झाली.

आज शेअर बाजार दिवसाच्या उच्चांकावरून जवळपास 100 अंकांनी घसरला. क्षेत्रनिहाय वाढणाऱ्या निर्देशांकांमध्ये निफ्टी ऑटो इंडेक्स पहिल्या क्रमांकावर होता. आयटी व्यवसायातील कंपनी टीसीएस आणि इन्फोसिसच्या निकालाच्या प्रतीक्षेत दिवसभर शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला.

Nifty 50, Sensex end in the green for third consecutive day; smallcap index hits record high
अर्थसंकल्प 2024ची तारीख झाली जाहीर; अर्थमंत्री सीतारामन 'या' दिवशी सादर करणार अंतरिम अर्थसंकल्प

आज व्यवहारात रिलायन्स इंडस्ट्रीज आणि खासगी बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. आज सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह व्यवहार करत होते. शेअर बाजारातील टॉप गेनर्समध्ये Hero MotoCorp, Bajaj Auto, Reliance Industries आणि Axis Bank यांचे शेअर्स होते, तर टॉप लूजर्सच्या यादीत इन्फोसिस, डॉ. रेड्डीज, एसबीआय लाईफ आणि एचयूएलचे शेअर्स होते.

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये जिओ फायनान्शियल, एक्साइड इंडस्ट्रीज, कामधेनू, ओम इन्फ्रा, टाटा मोटर्स, पटेल इंजिनीअरिंग, कोटक महिंद्रा बँक, स्टोव्ह क्राफ्ट यांचे शेअर्स वाढले.

तर एचडीएफसी लाईफ, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा, युनि पार्ट्स, एचडीएफसी बँक, देवयानी इंटरनॅशनल, नेस्ले इंडिया, ब्रँड कॉन्सेप्ट आणि ग्लोबस स्पिरिटचे शेअर्स घसरले.

Nifty 50, Sensex end in the green for third consecutive day; smallcap index hits record high
India-Maldives Row: 'राष्ट्र प्रथम व्यवसाय नंतर', भारत मालदीव वादात 'या' कंपनीची जाहिरात चर्चेत

गुंतवणूकदारांनी 1.76 लाख कोटी कमावले

BSE वर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 11 जानेवारी रोजी वाढून 370.52 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग सत्रात म्हणजे बुधवारी 10 जानेवारी रोजी 368.76 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.76 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.76 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.