Share Market Closing: मिडकॅप आणि स्मॉलकॅपचा 'फुगा' फुटला? बाजारातील विक्रीत गुंतवणूकदारांचे 13.50 लाख कोटींचे नुकसान

Share Market Today: बुधवारी शेअर बाजारात जोरदार घसरण दिसून आली. जोरदार सुरुवात होऊनही बाजार दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स 906 अंकांनी घसरून 72,761 वर आला, तर सेन्सेक्स निर्देशांकाने इंट्राडेमध्ये 74,052 चा उच्चांक गाठला.
Nifty sinks below 22,000, Sensex plunges 900 pts; all sectors bleed
Nifty sinks below 22,000, Sensex plunges 900 pts; all sectors bleed Sakal
Updated on

Share Market Closing Latest Update 13 March 2024: बुधवारी शेअर बाजारात जोरदार घसरण दिसून आली. जोरदार सुरुवात होऊनही बाजार दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स 906 अंकांनी घसरून 72,761 वर आला, तर सेन्सेक्स निर्देशांकाने इंट्राडेमध्ये 74,052 चा उच्चांक गाठला.

निफ्टी देखील 22,446 च्या उच्चांकावरून घसरला आणि 21,997 वर बंद झाला. मेटल, रियल्टी, पीएसयू बँका आणि मीडिया क्षेत्र विक्रीत आघाडीवर होते. तर एफएमसीजी क्षेत्रात खरेदी झाली.

Share Market Today
Share Market TodaySakal

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

शेअर बाजारातील घसरणीचे महत्त्वाचे कारण म्हणजे स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये झालेली विक्री. बुधवारी स्मॉल कॅप निर्देशांक पाच टक्क्यांनी तर मिडकॅप निर्देशांक तीन टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले. स्मॉल कॅप आणि एसएमई शेअर्स पाच टक्क्यांनी घसरले.

Share Market Today
Share Market TodaySakal

शेअर बाजारातील घसरणीचे कारण काय?

अनेक शेअर बाजार तज्ञ आणि भांडवली बाजार नियामक सेबीच्या प्रमुख म्हणाल्या की स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये एक फुगा तयार होत आहे, ज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये जोरदार विक्री सुरू आहे.

Nifty sinks below 22,000, Sensex plunges 900 pts; all sectors bleed
Anil Ambani: कर्जबाजारी अनिल अंबानींना मिळणार 4,000,00,00,000 रुपयांचा चेक, पण हातून जाणार मोठा प्रकल्प

कोणते शेअर्स वाढले?

शेअर बाजारातील घसरणीच्या काळातही आयटीसीचे शेअर्स 4.29 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स आणि कोटक बँकेचे शेअर्स वाढले तर पॉवर ग्रिड, कोल इंडियाचे शेअर्स सात टक्क्यांहून अधिक घसरले. अदानी एंटरप्रायझेस आणि एनटीपीसीमध्येही सुमारे 7 टक्के घसरण झाली आहे.

S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEXSakal

शेअर बाजारातील टॉप गेनर्समध्ये आयटीसी, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, सिप्ला, बजाज फायनान्स आणि डॉ. रेड्डीज लॅब्सचे शेअर्स होते, तर सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये कोल इंडिया लिमिटेड, पॉवर ग्रिड, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, टाटा स्टील आणि ओएनजीसीच्या शेअर्सचा समावेश होता.

Nifty sinks below 22,000, Sensex plunges 900 pts; all sectors bleed
Bankruptcy: सर्वात मोठी कंपनी झाली दिवाळखोर; अमेरिकेत बंद होणार व्यवसाय, कॅनडामध्येही स्टोअर्सला लागले टाळे

गुंतवणूकदारांचे 13.50 लाख कोटी रुपयांचे नुकसान

शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होण्याचे कारण म्हणजे स्मॉल कॅप आणि मिड कॅप सेगमेंटमध्ये तयार झालेला फुगा. शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 13.50 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.