Agri Stocks: कृषी कंपनी निर्माण ऍग्री जेनेटिक्स लिमिटेडचे (Nirman Agri Genetics) शेअर्स नुकतेच 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर पोहोचले. गुरुवारी आणि शुक्रवारी सलग दोन्ही दिवस यात 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. या कृषी कंपनीच्या शेअर्सने 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 70% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.
गुरुवारी हा शेअर 298.30 रुपयांवर बंद झाला होता. तर शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात तो 5% वरच्या सर्किटसह 313.80 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर (All time high) पोहोचला.
निर्माण ऍग्री जेनेटिक्सला गुरुवारी भगवती कृषी सेवेकडून 41 लाख 10 हजार 297 रुपयांच्या कृषी बियाण्यांचा पुरवठा करण्यासाठी ऑर्डर मिळाली. कृषी बियाणे मिळाल्याच्या वृत्तामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट लागले आहे.
ऍग्री जेनेटिक्सचे शेअर्स या वर्षी मार्चमध्ये एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्ट झाले होते. कंपनीने प्रायमरी मार्केटमधून 99 रुपयांच्या इश्यू किंमतीला शेअर्स विकून 20.30 कोटी उभे केले होते.
निर्माण ऍग्री जेनेटिक्सच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांना अवघ्या 9 महिन्यांत तिप्पट परतावा मिळाला आहे. निर्माण ऍग्री जेनेटिक्सचे शेअर्स एका आठवड्यात 41 टक्क्यांनी वाढले आहेत.
एका महिन्यात त्यात 36 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. याने 3 महिन्यांत गुंतवणूकदारांना 73 टक्के परतावा दिला. त्याच वेळी, 6 महिन्यांत स्टॉकचा परतावा 128 टक्के होता. लिस्टिंग झाल्यापासून, त्याने 210 टक्के बंपर परतावा दिला आहे.
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.