Nitin Desai Case: नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या एडलवाईस कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण

Nitin Desai Case: देसाईंच्या कुटुंबीयांनी एडलवाईज कंपनीवर नितीन देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे
Nitin Desai Case
Nitin Desai CaseSakal
Updated on

Nitin Desai Case: प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. नितीन देसाई यांच्यावर खूप कर्ज होते, त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी एडलवाईज कंपनीवर नितीन देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. नितीन देसाई यांनी कर्जाची रक्कम फेडण्यास तयार होते कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

नितीन देसाईंची पत्नी नेहा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईस ग्रुपने कर्ज वसुलीसाठी नितीन देसाईंवर मानसिक दबाव टाकला, त्यामुळे त्यांनी हे मोठे पाऊल उचलले. कंपनीने तोडगा काढण्याचा प्रयत्न न करता केवळ त्रास दिला.

नितीन देसाईंची पत्नी नेहा यांनी एडलवाईस ग्रुप आणि ईसीएल फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांसह पाच जणांविरुद्ध लेखी तक्रार दिली होती आणि एफआयआर दाखल केला होता.

Nitin Desai Case
Nitin Desai Death : आजचा दिवस आमच्यासाठी ‘ब्लॅक संडे’!

याप्रकरणी कंपनीने वक्तव्य केले होते. त्यात असे म्हटले होते की, आपण कलादिग्दर्शकावर कोणताही दबाव टाकला नसल्याचे सांगत त्यांनी आपले निवेदन प्रसिद्ध केले. तसेच कंपनीने जास्त व्याजही घेतलेले नाही.

रायगड पोलिसांनी देसाई यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली एडलवाईस समूहाचे अध्यक्ष रसेश शाह आणि एडलवाईस एआरसी अधिकाऱ्यांसह इतर चार जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला.

Nitin Desai Case
LIC Scheme: LIC च्या 'या' पॉलिसीमध्ये महिलांना मिळू शकतो 11 लाखांचा परतावा! दररोज किती गुंतवणूक करावी लागेल?

कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण:

एडलवाईस कंपनीने स्टाॅक मार्केटला पत्र पाठवून सांगितले की, RBI च्या नियमानुसारचं कायद्यामध्ये राहून कारवाई केली होती. कोणत्याही कर्जदारावर कर्ज वसुलीसाठी दबाव टाकला नाही. असं या पत्रात नमुद केलं आहे. या प्रकरणानंतर एडलवाईस कंपनीचे शेअर्स 85 पैशांनी घसरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.