Adani Jaipur Airport: अदानी समूहाकडून जीएसटी वसूल न करण्याचा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अदानी समूहाला मोठा दिलासा मिळाला आहे. समूहाने गेल्या काही वर्षांत आपला विमानतळ ऑपरेशन व्यवसाय (अदानी एअरपोर्ट ऑपरेशन बिझनेस) लक्षणीयरीत्या विस्तारला आहे.
जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही त्या विमानतळांमध्ये समावेश आहे. जयपूर विमानतळाचे अदानी समूहाला संचालनाचे अधिकार मिळाले आहेत. या विमानतळाशी संबंधित करारावर अदानी समूहाला मोठा नफा झाला आहे. आता या डीलवर समूहाला जीएसटी भरावा लागणार नाही.
विमानतळ नियामकाने अभिप्राय मागवला होता:
Advance Ruling Authority ने याबाबत निर्णय दिला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने निर्णयात म्हटले आहे की जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन भारतीय विमानतळ प्राधिकरणाने अदानी समूहाकडे सोपवण्याच्या करारावर जीएसटी लागू होत नाही.
AAI ने AAR च्या राजस्थान खंडपीठाला विचारले होते की अदानी जयपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला व्यवसाय सोपवल्यावर वस्तू आणि सेवा कर (GST) लागू होईल का? यावर AAR ने या संदर्भात आपला निकाल दिला आहे.
जीएसटी कायद्यांतर्गत व्यवसायाचे हस्तांतरण किंवा त्याचा स्वतंत्र भाग म्हणून हस्तांतरण ही सेवा मानली जाते. ऑक्टोबर 2021 मध्ये, अदानी समूहाने जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन, व्यवस्थापन आणि विकास करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणा (AAI) कडून घेतला आहे.
हे विमानतळ भारत सरकारने अदानी समूहाला 50 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिले आहे. त्यामुळे या प्रकरणात अदानी समूहाकडून जीएसटी वसूल होणार नाही. हा करार दोन वर्षांपूर्वी झाला होता.
AMRG आणि असोसिएट्सचे वरिष्ठ भागीदार रजत मोहन यांच्या मते, अॅथॉरिटी फॉर अॅडव्हान्स रुलिंग (AAR) ने असा निर्णय दिला आहे की भारतीय विमानतळ प्राधिकरणाने संपूर्ण विमानतळ चालवण्याच्या व्यवसायाच्या हस्तांतरणातून मिळणारी रक्कम ही कर तटस्थ पुरवठा आहे.
त्यामुळे अदानी समूहाला जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ऑपरेशन्सच्या हस्तांतरणावर कोणताही जीएसटी भरावा लागणार नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.