Stock Market: मोठी बातमी! NSE ने घेतला मोठा निर्णय; आता शेअर्सची खरेदी-विक्री होणार आणखी स्वस्त

NSE To Cut Cash: आता नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर शेअर्सची खरेदी-विक्री स्वस्त होणार आहे. NSE ने मंगळवारी (12 मार्च) रोख आणि डेरिव्हेटिव्ह विभागातील इक्विटी ट्रेडिंगवरील व्यवहार शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
NSE cuts transaction charges by 1 percent plans exit from non-core businesses
NSE cuts transaction charges by 1 percent plans exit from non-core businessesSakal
Updated on

NSE To Cut Cash: आता नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर शेअर्सची खरेदी-विक्री स्वस्त होणार आहे. NSE ने मंगळवारी (12 मार्च) रोख आणि डेरिव्हेटिव्ह विभागातील इक्विटी ट्रेडिंगवरील व्यवहार शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, NSE रोख आणि डेरिव्हेटिव्हज व्यवहार शुल्क कमी करणार आहे. (NSE cuts transaction charges by 1 percent plans exit from non-core businesses)

NSE वर रोख आणि डेरिव्हेटिव्ह व्यवहार शुल्क 1% कमी केले जाईल. या बातमीनंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या शेअर्समध्ये अचानक 6% ची घसरण झाली. सोमवारी दुपारच्या सत्रापर्यंत, BSE शेअर्स सुमारे 6% च्या घसरणीसह प्रति शेअर 2075 च्या किंमतीवर व्यवहार करताना दिसले. या कपातीनंतर, NSE वरील इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह विभागातील व्यवहार शुल्क बीएसईच्या तुलनेत स्वस्त झाले आहेत.

NSE cuts transaction charges by 1 percent plans exit from non-core businesses
Mutual Fund: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या महिलांची संख्या जास्त; बाजारातील हिस्सा इतक्या टक्क्यांनी वाढला

कपात कधी लागू होणार?

ही कपात 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. मनीकंट्रोलने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की NSE च्या या निर्णयामुळे वार्षिक उत्पन्न सुमारे 130 कोटी खर्च होईल. (NSE To Cut Cash, Derivatives Transaction Charges By 1% From April 1)

व्यवहार शुल्कात कपात करण्याच्या घोषणेबरोबरच, NSE ने तंत्रज्ञान आणि शिक्षण यासारख्या नॉन-कोअर व्यवसायांमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. NSE च्या या निर्गुंतवणूक प्रक्रियेत 60 कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे आणि 7 कंपन्यांनी बंधनकारक नसलेल्या बोली लावल्या आहेत.

NSE cuts transaction charges by 1 percent plans exit from non-core businesses
Mutual Fund: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या महिलांची संख्या जास्त; बाजारातील हिस्सा इतक्या टक्क्यांनी वाढला

NSE ची 100% मालकीची उपकंपनी NSEIT आपला डिजिटल तंत्रज्ञान व्यवसाय NSEIT US, Aujas Cybersecurity आणि CXIO Technologies सोबत विकत आहे. ही विक्री InvestCorp ला 1,000 कोटींना होईल. NSE च्या डिजिटल तंत्रज्ञान व्यवसायाचे एंटरप्राइझ मूल्य 425 - 475 कोटी असा अंदाज आहे.

NSE cuts transaction charges by 1 percent plans exit from non-core businesses
Fastag Banks List : आता कुठून घेता येईल नवीन फास्टॅग? NHAI ने प्रसिद्ध केली बँका अन् वित्तसंस्थांची नवी यादी

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.