Stock Market: 2 मार्चला शनिवारीही उघडणार शेअर बाजार; NSEमध्ये विशेष ट्रेडिंग सत्र, काय आहे कारण?

Stock Market Special Trading Session: नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) शनिवार, 2 मार्च रोजी विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित करण्याची घोषणा केली आहे. या दिवशी, डिझास्टर रिकव्हरी साइटवर इंट्राडे स्विच ओव्हर केले जाईल.
NSE to conduct special live trading session on March 2 with intraday switch to DR site
NSE to conduct special live trading session on March 2 with intraday switch to DR siteSakal
Updated on

Stock Market Special Trading Session: नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) शनिवार, 2 मार्च रोजी विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित करण्याची घोषणा केली आहे. बुधवारी एक परिपत्रक जारी करून, NSEने सांगितले की 2 मार्च रोजी होणाऱ्या या सत्रात इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये ट्रेडिंग केले जाईल.

या दिवशी, डिझास्टर रिकव्हरी साइटवर इंट्राडे स्विच ओव्हर केले जाईल. ही साइट सायबर हल्ल्यांसारख्या परिस्थितीत डेटाचे संरक्षण करण्यासाठी काम करेल. यामुळे व्यापारही अधिक सुरक्षित होईल. (NSE to conduct special trading session on March 2 to test disaster recovery switch)

2 मार्च रोजी F&O या विभागामध्ये ट्रेडिंग होईल. डिझास्टर रिकव्हरीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराकडून ही चाचणी केली जात आहे. विशेष ट्रेडिंग सत्रामध्ये, त्या दिवशी ट्रेडिंग सत्र प्राथमिक साइटवरून रिकव्हरी साइटवर स्विच केले जाईल. (NSE to hold special trading session on March 2 with intraday switch to disaster recovery site)

NSE to conduct special live trading session on March 2 with intraday switch to DR site
Paytm Crisis: पेटीएमला मोठा धक्का! पेटीएम पेमेंट बँकेवर फेमा अंतर्गत गुन्हा दाखल, पुढे काय होणार?

अप्पर आणि लोअर सर्किट 5% असेल

डिझास्टर रिकव्हरी सत्र दोन टप्प्यात पूर्ण केले जाईल. पहिले सत्र सकाळी 9.15 वाजता सुरू होणार असून ते सकाळी 10 वाजेपर्यंत चालणार आहे. हे ट्रेडिंग प्राथमिक साइटवर होईल.

सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 या वेळेत होणारे दुसरे सत्र डिझास्टर रिकव्हरी साइटवर स्विच ओव्हर होईल. सर्व प्रकारच्या सिक्युरिटीजसाठी अप्पर आणि लोअर सर्किट 5% असेल.

24 फेब्रुवारी 2021 रोजी NSE वर तांत्रिक समस्या आली, ज्यामुळे डिझास्टर रिकव्हरी साइटची आवश्यकता भासू लागली. तांत्रिक समस्यांमुळे NSE वरील ट्रेडिंग 1140 ते 345 दरम्यान थांबवण्यात आले. या काळात गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले.

NSE to conduct special live trading session on March 2 with intraday switch to DR site
RBI Action: व्हिसा आणि मास्टरकार्डवर आरबीआयची मोठी कारवाई; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्याचा हेतू

यापूर्वी, बीएसई आणि एनएसईने 20 जानेवारी रोजी डिझास्टर रिकव्हरी साइटवर स्विच करण्याची घोषणा केली होती. बीएसई आणि एनएसई वर ट्रेडिंग करून डीआर साइटची कामगिरी कशी आहे हे तपासायचे होते.

तसेच ट्रेडिंग सायबर हल्ले, सर्व्हर क्रॅश किंवा इतर कोणत्याही समस्यांपासून संरक्षणासाठी डीआर साइटची गरज आहे. यामुळे बाजार आणि गुंतवणूकदारांची सुरक्षितता राखली जाईल. सेबी आणि तांत्रिक सल्लागार समितीच्या सूचनांनुसार ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.