NSE Warns Investors: डीपफेक व्हिडीओबाबत एनएसईने गुंतवणूकदारांना दिला इशारा; काय आहे संपूर्ण प्रकरण?

NSE Warns Investors: नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE) गुंतवणूकदारांना डीपफेक व्हिडीओबाबत इशारा दिला आहे. एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आशिषकुमार चौहान यांचा गुंतवणुकीचा सल्ला देणारा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एनएसईने हा इशारा दिला आहे.
NSE Warns Investors:
NSE Warns Investors:Sakal
Updated on

NSE CEO's Deepfake Video: नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE) गुंतवणूकदारांना डीपफेक व्हिडीओबाबत इशारा दिला आहे. एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आशिषकुमार चौहान यांचा गुंतवणुकीचा सल्ला देणारा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एनएसईने हा इशारा दिला आहे.

एका निवेदनात, एक्सचेंजने म्हटले आहे की, आशिषकुमार चौहान यांचा चेहरा/आवाज आणि NSE लोगोचा वापर काही गुंतवणूक आणि सल्लागार ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिपमध्ये डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून खोट्या पद्धतीने तयार केल्याचे लक्षात आले आहे.

एनएसईने असे म्हटले आहे की चौहान यांच्या आवाजाची आणि चेहऱ्यावरील हावभावांची नक्कल करण्यासाठी डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून असे व्हिडीओ तयार केले गेले आहेत. याव्यतिरिक्त, एक्सचेंज शक्य असेल तेथे या प्लॅटफॉर्मवरून हे आक्षेपार्ह व्हिडीओ काढून टाकण्याची विनंती करण्याचा प्रयत्न करत आहे.

NSE Warns Investors:
Food Inflation: सर्वसामान्यांना मोठा झटका! महागाईने गाठला कळस; खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ

NSE प्रक्रियेनुसार, कोणतीही अधिकृत माहिती फक्त NSE च्या अधिकृत वेबसाइट www.nseindia.com आणि एक्सचेंजच्या सोशल मीडिया हँडलद्वारे पाठवली जाऊ शकते – X: @NSEIndia; फेसबुक: @NSE इंडिया; Instagram: @nseindia; लिंक्डइन: @NSEIndia; YouTube: फक्त NSE India द्वारे पाठवली जाऊ शकते.

एक्सचेंजने सर्वांना विनंती केली आहे की NSE ने पाठवलेल्या कम्युनिकेशन्स आणि कंटेंटची माहिती तपासा आणि अधिकृत सोशल मीडिया हँडल देखील तपासा. तसेच, सर्व गुंतवणूकदारांना हे लक्षात ठेवण्यास सांगितले आहे आणि NSE किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या वेबसाइटवर येत असलेल्या माहितीची पडताळणी करावी.

NSE Warns Investors:
Tax Devolution: मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर सर्वाधिक पैसे यूपी-बिहारला; मध्य प्रदेशपेक्षा महाराष्ट्राला कमी रक्कम!

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com