Upcoming IPO: लवकरच येतोय भारतातील पहिल्या इलेक्ट्रीक व्हेहिकलचा आयपीओ

Upcoming IPO: इलेक्ट्रिक स्कूटर निर्मात्या ओला इलेक्ट्रिकचा (Ola Electric) आयपीओ लवकरच येऊ शकतो. कारण त्यांनी आपल्या या आयपीओच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे. आयपीओच्या माध्यमातून 7,250 कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा मानस आहे.
Ola Electric first Indian EV maker to file for IPO
Ola Electric first Indian EV maker to file for IPO Sakal
Updated on

Upcoming IPO: इलेक्ट्रिक स्कूटर निर्माती कंपनी ओला इलेक्ट्रिकचा (Ola Electric) आयपीओ लवकरच येऊ शकतो. कारण त्यांनी आपल्या या आयपीओच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे. कंपनीने 22 डिसेंबरला सेबीला आयपीओसाठी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) मसुदा सादर केला.

आयपीओसाठी कागदपत्रे सादर करणारी ओला इलेक्ट्रिक ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक वाहन कंपनी आहे. या इश्यूमध्ये नवीन शेअर्सद्वारे 5,500 कोटी उभे केले जातील, तर 1,750 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) विकले जातील.

ओएफएसमध्ये ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक भाविश अग्रवाल यांच्या वतीने सुमारे 4.74 कोटी शेअर्स विक्रीसाठी ठेवले जातील. कंपनीतील मोठी गुंतवणूकदार जपानची सॉफ्टबँक 2.39 कोटी शेअर्स विक्रीसाठी ठेवणार आहे.

या आयपीओच्या माध्यमातून 7,250 कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. डीआरएचपीनुसार, ओएफएसमध्ये 10 रुपयांचे फेस व्हॅल्यूचे 95,191,195 इक्विटी शेअर्स ऑफर केले जातील.

भाविश अग्रवाल आणि सॉफ्टबँक व्यतिरिक्त, ओला इलेक्ट्रिकचे विद्यमान गुंतवणूकदार टेमासेक, टायगर ग्लोबल, अल्फा वेव्ह, टेक्ने कॅपिटल, मॅट्रिक्स पार्टनर्स देखील ओएफएसमध्ये शेअर्स विक्रीसाठी ठेवतील.

ओला इलेक्ट्रिक आयपीओतून येणाऱ्या रक्कमेचा वापर कुठे होणार ?

- ओला सेल टेक्नॉलॉजीजच्या गिगाफॅक्टरी प्रोजेक्टसाठी 1,226.4 कोटी खर्च केले जातील. रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी 1,600 कोटी खर्च केले जातील.

- सेंद्रिय विकास उपक्रम आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी 350 कोटी खर्च केले जातील.

- ओला इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीजच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी 800 कोटी वापरले जातील.

ओला इलेक्ट्रिक आयपीओमध्ये, 75 टक्के हिस्सा क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल बायर्स (QIBs), 15 टक्के नॉन इंस्टीट्यूशनल इनवेस्टर्ससाठी आणि 10 टक्के रिटेल इनवेस्टर्ससाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

Ola Electric first Indian EV maker to file for IPO
Dividend Stock: 'या' दोन कंपन्यांनी जाहीर केला डिव्हिडेंड, रेकॉर्ड डेट जवळ

कोटक महिंद्रा कॅपिटल, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया, बीओएफए सिक्युरिटीज इंडिया, गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज, ऍक्सिस कॅपिटल, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, एसबीआय कॅपिटल मार्केट्स आणि बीओबी कॅपिटल मार्केट्स हे इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

आयपीओसाठी रजिस्ट्रार लिंक इनटाइम इंडिया आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा महसूल वाढून 2,630.93 कोटी झाला, तर आर्थिक वर्ष 2022 मध्ये हा आकडा 373.42 कोटी होता.

Ola Electric first Indian EV maker to file for IPO
Upcoming IPO: वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात आणखी एक IPO खुला होणार, एक शेअर किती रुपयांना मिळणार?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.