Multibagger Stock: शेअर बाजारात मल्टीबॅगर शेअर्स तुम्हाला दमदार कमाई करुन देऊ शकतात. तुम्हीही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर तुम्ही ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चरच्या (Oriental Rail Infrastructure) शेअर्सचा विचार करु शकता.
या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना कमी कालावधीत उत्कृष्ट परतावा दिला आहे. सध्या हा शेअर 224.05 रुपयांवर ट्रेड करत आहे. या शेअरमध्ये गेल्या काही काळापासून सतत अप्पर सर्किट लागत आहे.
कंपनीच्या बोर्डाने 215 कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. नवीन इक्विटी शेअर्स, कनव्हर्टिबल सिक्युरिटीज किंवा डेट सिक्युरिटीजसह हा निधी उभारला जाईल. यासाठी रेग्युलेटरी अप्रुव्हल आणि शेयरहोल्डर अप्रुव्हल आवश्यक असेल.
याव्यतिरिक्त, मंडळाने 50,56,000 नवीन इक्विटी शेअर्स 169 रुपये प्रति शेअरच्या दराने जारी करण्याचा आणि वाटप करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, जो शेयरहोल्डर आणि रेग्युलेटरी अप्रुव्हलच्या अधीन आहे.
यामध्ये मुकुल महावीर अग्रवाल या गुंतवणूकदाराने 169 रुपये प्रति शेअर दराने 34,00,000 शेअर्स खरेदी केले, जे एकूण 57.46 कोटी आहे. त्याच्यासह इतर 28 नॉन-प्रमोटर्सही सहभागी आहेत.
अलीकडेच कंपनीला भारतीय रेल्वेच्या मॉडर्न कोच फॅक्टरी (MCF), रायबरेली कडून 12 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. ऑर्डरमध्ये एलएचबी एसी3टी इकॉनॉमी कोचसाठी 126 सीट्स आणि बर्थचे उत्पादन आणि पुरवठा समाविष्ट आहे.
या स्टॉकने अवघ्या 3 महिन्यांत 170 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. त्याच वेळी, त्याच्या गुंतवणूकदारांना 6 महिन्यांत 416 टक्के इतका दमदार नफा मिळाला आहे. या वर्षात आतापर्यंत कंपनीचे शेअर्स 193 टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीचे मार्केट कॅप 1,200 कोटीपेक्षा जास्त आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.