Ullu Digital IPO: OTT प्लॅटफॉर्म Ullu Digital IPO लॉन्च करणार आहे. यासाठी कंपनीने मसुदा कागदपत्रे बाजार नियामक सेबीकडे सादर केली आहेत. कंपनीला आयपीओद्वारे 135-150 कोटी रुपये उभे करायचे आहेत. पब्लिक इश्यूमध्ये सुमारे 62.6 लाख नवीन शेअर्स जारी केले जातील. विक्रीसाठी कोणतीही ऑफर असणार नाही. उल्लू डिजिटलला त्याच्या IPO साठी SEBI कडून मंजुरी मिळाल्यास, तो आतापर्यंतचा सर्वात मोठा SME IPO असेल.
भारतातील SME विभागातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असेल. मात्र, त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. सध्या, SME विभागातील सर्वात मोठ्या IPO चा विक्रम स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंटच्या नावावर आहे. स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंटने काही काळापूर्वी रु. 105 कोटींचा IPO आणला होता.
उल्लू डिजिटल हे उल्लू ॲप/वेबसाइटद्वारे विविध प्रकारचे मनोरंजन कंटेट तयार करते. यामध्ये वेब सिरीज, शॉर्ट फिल्म्स आणि शो यांचा समावेश आहे. विभू अग्रवाल आणि त्यांची पत्नी मेघा अग्रवाल हे कंपनीचे मालक आहेत. सध्या विभू आणि मेघा अग्रवाल यांची उल्लूमध्ये 95 टक्के भागीदारी आहे. उर्वरित 5 टक्के हिस्सा सार्वजनिक भागधारक जेनिथ मल्टी ट्रेडिंग DMCC कडे आहे.
कंपनी मुख्यत्वे IPO मधील निधी आंतरराष्ट्रीय शो हक्कांची खरेदी, तंत्रज्ञानातील गुंतवणूक आणि कर्मचारी नियुक्तीसाठी वापरेल. याशिवाय, हे पैसे खेळत्या भांडवलाच्या गरजा आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी देखील वापरले जातील.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.