PNG Jewellers Share : ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या शेअरची नोंदणी; IPOमधील किंमतीपेक्षा ७३ टक्के अधिक भाव
प्रसिद्ध सराफी पेढी ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या शेअरची मंगळवारी (ता.१७) मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) ७३ टक्के प्रीमियमसह नोंदणी झाली.
मुंबई : प्रसिद्ध सराफी पेढी ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या शेअरची मंगळवारी (ता.१७) मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) ७३ टक्के प्रीमियमसह नोंदणी झाली. ‘आयपीओ’मध्ये याची किंमत प्रतिशेअर ४६६ ते ४८० रुपये होती.