Paytm Share: एका वर्षात गुंवणुकदारांचे पैसै झाले दुप्पट! पेटीएमच्या महसुलात 32 टक्क्यांची वाढ

Paytm Share: एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत.
Paytm Share In one year, the money of the investors has doubled! 32 percent growth in Paytm's revenue
Paytm Share In one year, the money of the investors has doubled! 32 percent growth in Paytm's revenue Sakal
Updated on

Paytm Share: पेटीएमच्या शेअर्सने त्यांच्या गुंतवणुकदारांना अच्छे दिन दाखवले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण फिनटेक कंपनी पेटीएमचा निव्वळ तोटा सप्टेंबरच्या तिमाहीत निम्मा झाला. वार्षिक आधारावर महसुलात 32 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

शेअर्सबद्दल बोलायचे झाले तर एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. ब्रोकरेज फर्म्स सध्या पेटीएममध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला देत आहेत. त्याचे शेअर्स सध्याच्या पातळीपासून 28 टक्क्यांहून अधिक वाढू शकतात असे त्यांचे म्हणणे आहे.

सध्या हा शेअर बीएसईवर 903.80 रुपयांवर बंद झाला होता. गेल्या वर्षी 24 नोव्हेंबर 2022 रोजी, तो 439.60 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता आणि गेल्या महिन्यात 20 ऑक्टोबर 2023 रोजी तो 998.30 रुपयांच्या एका वर्षाच्या उच्चांकावर होता.

सप्टेंबर तिमाहीत पेटीएमची व्यावसायिक कामगिरी ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या अंदाजानुसार होती. तिच्या GMV (ग्रॉस मर्चेंडाईज व्हॅल्यू) ची वाढ कायम राहिली आणि कर्ज वितरणाच्या बाबतीत कंपनीची वाढही चांगली होती.

Paytm Share In one year, the money of the investors has doubled! 32 percent growth in Paytm's revenue
Multibagger Stock: गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 73 टक्के नफा; तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर?

सबस्क्रिप्शन डिव्‍हाइसेससह, त्याने सप्टेंबर तिमाहीत पेटीएमच्या कमाईला चांगला आधार दिला. या सर्व कारणांमुळे, ब्रोकरेज मोतीलाल ओसवाल यांनी एका वर्षाच्या कालावधीसाठी पेटीएममधील गुंतवणुकीसाठीचे टारगेट 1160 रुपये निश्चित केले आहे.

ब्रोकरेजने निश्चित केलेल्या टारगेटपेक्षा सध्या तो 46 टक्के सूटीवर मिळत आहे. त्यामुळे हे शेअर्स आता खरेदी करण्याची सुवर्णसंधी असल्याचे ब्रोकरेज फर्म्सचे म्हणणे आहे.

Paytm Share In one year, the money of the investors has doubled! 32 percent growth in Paytm's revenue
Man Industries: मॅन इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर, काय आहे कारण?

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.