Paytm : 5 महिन्यांनी पेटीएमचे शेअर्स 500 रुपयांच्या पार, सरकारच्या मंजूरीनंतर शेअर्समध्ये दमदार खरेदी

paytm latest news in marathi |फिनटेक कंपनी पेटीएमला (Paytm) तिच्या एका महत्त्वाच्या उपकंपनीमध्ये 50 कोटीच्या गुंतवणुकीसाठी सरकारची मंजुरी मिळाली आहे.
paytm
paytmSakal
Updated on

फिनटेक कंपनी पेटीएमला (Paytm) तिच्या एका महत्त्वाच्या उपकंपनीमध्ये 50 कोटीच्या गुंतवणुकीसाठी सरकारची मंजुरी मिळाली आहे. अर्थ मंत्रालयाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. कंपनी बऱ्याच दिवसांपासून या मंजुरीची वाट पाहत होती.

कंपनीचे चीनशी संबंध असल्याने अनेक महिने हा मुद्दा रखडला होता. मात्र आता मार्ग मोकळा झाला आहे, पेटीएम पेमेंट सर्विसेजचा सामान्य व्यवसाय पुन्हा सुरू होऊ शकतो. ही मंजुरी उघड होताच, गुंतवणूकदारांनी त्याच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी केली. आता कंपनी पेमेंट एग्रीगेटर परवान्यासाठी केंद्रीय बँक आरबीआयकडे अर्ज करू शकते ज्यावर आरबीआय निर्णय घेईल.

शुक्रवारी दुपारपर्यंत तो ग्रीन ते रेड झोनकडे झुकत होता आणि नंतर अचानक वर चढू लागला आणि नंतर 10 टक्क्यांच्या वाढीसह 508.85 रुपयांवर अप्पर सर्किटवर पोहोचला. या अप्पर सर्किटवरच तो बंद झाला. 8 फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच त्याचे शेअर्स 500 रुपयांच्या पुढे गेले आहेत. याआधी 8 फेब्रुवारीला इंट्रा-डेमध्ये तो 526.40 रुपयांवर होता.

पेटीएमचे शेअर्स जानेवारीमध्ये 800 रुपयांच्या आसपास पोहोचले होते. पण, त्यानंतर आरबीआयने आपल्या पेमेंट बँकेवर कारवाई केली आणि ठराविक वेळेनंतर म्हणजेच अंतिम मुदत पूर्ण झाल्यानंतर बँकिंग सेवा देण्यास बंदी घातली.

यामुळे पेटीएमचे शेअर्स हादरले आणि ते सलग तीन दिवस लोअर सर्किटला लागले आणि त्यात 42 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. जून 2024 च्या तिमाहीत तिचा महसूल वार्षिक आधारावर 36 टक्क्यांनी घसरून 1502 कोटीवर आला.

paytm
Paytm Layoffs : एक बॅन आणि पेटीएमच्या हजारो कर्मचाऱ्यांनी झटक्यात गमावल्या नोकऱ्या; जाणून घ्या काय आहे प्रकरण

त्याचा निव्वळ तोटाही 840 कोटीपर्यंत वाढला आहे. त्याच्या लिस्टींगनंतर हा सर्वात मोठा तोटा आहे. त्याचे शेअर्स 18 नोव्हेंबर 2021 रोजी लिस्ट झाले. आयपीओ गुंतवणूकदारांना 2150 रुपयांच्या किमतीत शेअर्स जारी केले गेले पण ते कधीच या पातळीवर पोहोचले नाही.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.