Paytm Share Lower Circuit: पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेडचे शेअर्स गुरुवारी आणि शुक्रवारी सलग दोन दिवस 20% घसरल्यानंतर आज सोमवारी पुन्हा 10% घसरले. एक्सचेंजेसने पेटीएमसाठी लोअर सर्किट 20 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी सर्किट फिल्टरमध्ये बदल केला आहे.
पेटीएमवरील ब्रोकरेज हाऊसचा दृष्टिकोन सकारात्मक दिसत नाही. 5 आघाडीच्या ब्रोकरेज हाऊसने पेटीएम शेअर्सवरील लक्ष्य कमी केले आहे. RBIच्या कारवाईमुळे व्यवसायावर मोठा परिणाम होईल, असा विश्वास ब्रोकरेज हाऊसने व्यक्त केला आहे. ब्रोकरेज हाऊसेसने EBITDA अंदाज 18-22% ने कमी केला आहे.
ब्रोकरेज रेटिंग आणि लक्ष्य
पेटीएमचे मार्केट कॅप 27,838 कोटी रुपयांवर घसरले
एका अहवालानुसार, आता घसरणीनंतर पेटीएमचे मार्केट कॅप जवळपास 27,838 कोटी रुपयांवर घसरले आहे. इतकेच नाही तर या घसरणीनंतर बीएसई आणि एनएसईने कंपनीच्या शेअर्ससाठी लोअर सर्किट लिमिट 20 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर आणले आहे. आरबीआयने अलीकडेच पेटीएम पेमेंट बँकेवर बंदी घातली आहे.
यापूर्वी, पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी अलीकडेच कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी व्हर्च्युअल टाऊन हॉलमध्ये संवाद साधला होता. कंपनीत सुरू असलेल्या गोंधळा दरम्यान, त्यांनी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले होते की परिस्थिती नियंत्रणात आणली जाईल आणि निर्बंधांबाबतच्या सूचनांनुसार ते आरबीआयशी बोलत आहेत. पेटीएममध्ये 800 हून अधिक कर्मचारी काम करतात.
तज्ञांचे मत काय आहे?
पेटीएमचे प्रकरण आश्चर्यकारक असल्याचे मत ज्येष्ठ बाजार तज्ञ संजीव भसीन यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, पेटीएमचे शेअर्स दीर्घकाळासाठी चांगले असू शकतात, परंतु सध्या हा शेअर खरेदी करण्यापासून दूर राहण्यास सांगितले आहे. व्यवस्थापनाकडून अधिक स्पष्टीकरणाची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.