Piramal Pharma IPO: पिरामल फार्माच्या आयपीओसाठी प्राईस बँड निश्चित, जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर

Piramal Pharma IPO: पिरामल फार्माच्या बोर्डाने फेब्रुवारीमध्ये राइट्स इश्यूला मान्यता दिली आहे.
Piramal Pharma IPO
Piramal Pharma IPOSakal
Updated on

Piramal Pharma IPO: पिरामल फार्माचा आयपीओ येत्या 8 ऑगस्टला खुला होऊल. कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने यासाठी 81 रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित केला आहे. 1,050 कोटीचा हा इश्यू 8 ऑगस्टला खुला होऊन 16 ऑगस्टला बंद होईल.

कंपनीच्या बोर्डाने प्रत्येकी 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या 1,29,629,630 पेड-अप इक्विटी शेअर्ससाठी 1,050 कोटी रुपयांच्या राइट इश्यूला मान्यता दिल्याचे पिरामल फार्माने नियामक फायलिंगमध्ये सांगितले आहे.

इश्यूसाठी रेकॉर्ड डेट 2 जून निश्चित करण्यात आली आहे, ज्यामध्ये इश्यूसाठी पात्र भागधारकांची माहिती उपलब्ध करून दिली जाईल. या राइट्स इश्यू अंतर्गत, कंपनी शेअर सिक्युरिटीज जारी करते.

कंपन्या अनेकदा निधी उभारण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. कंपनीने राइट्स एंटाइटलमेंट रेश्यो 5:46 निश्चित केले आहे. याचा अर्थ शेअरधारकांकडे असलेल्या प्रत्येक 46 शेअर्समागे 5 राइट इक्विटी शेअर्स मिळतील.

Piramal Pharma IPO
Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न भरलाय पण रिफंड मिळालेला नाही? असा तपासा ऑनलाईन स्टेटस

राइट इश्यूच्या इतर अटी कंपनीच्या लेटर ऑफ ऑफरमध्ये समाविष्ट केल्या जातील, जे कंपनी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI), बीएसई, एनएसई यांना सादर करेल.

पिरामल फार्माच्या बोर्डाने फेब्रुवारीमध्ये राइट्स इश्यूला मान्यता दिली आहे. कंपनीने मार्चमध्ये सेबीकडे मसुदा सादर केला आणि 12 जुलैला ऑब्झर्वेशन लेटर मिळाले.

Piramal Pharma IPO
Financial Tips: गुंतवणूक, बचत आणि कर्ज काढण्यापूर्वी तरुणांनी फॉलो केल्या पाहिजेत अशा 10 सर्वोत्तम फायनान्स टिप्स

मसुद्यानुसार, कंपनी तिच्या राइट्स इश्यूमधून मिळालेली रक्कम कर्ज आणि इतर कारणांसाठी वापरेल. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 28 जुलैलाकंपनीचा शेअर 2.61 टक्क्यांनी घसरून 105.63 रुपयांवर बंद झाला. कंपनीचा स्टॉक या वर्षी 14% घसरला आहे, तर त्याचा एक वर्षाचा परतावा -45% आहे.

Piramal Pharma IPO
Multibagger Stocks: जीएनए एक्सल्स कंपनीने बोनस शेअर आणि डिव्हिडेंडच्या तारखेत केला बदल, काय आहे नवीन तारीख?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.