Income Tax Raid: पॉलीकॅबच्या 50 हून अधिक ठिकाणांवर आयकर विभागाचे छापे, शेअर्समध्ये मोठी घसरण

Income Tax Raid: आयकर विभागाने आज मुंबईतील पॉलीकॅब इंडियाच्या 50 हून अधिक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. माहितीनुसार, कंपनी व्यवस्थापनाच्या कार्यालये आणि घरांचीही झडती घेण्यात येत आहे.
Polycab India shares fall after Income Tax raids at 50 locations
Polycab India shares fall after Income Tax raids at 50 locations Sakal
Updated on

Income Tax Raid: आयकर विभागाने आज मुंबईतील पॉलीकॅब इंडियाच्या 50 हून अधिक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. माहितीनुसार, कंपनी व्यवस्थापनाच्या कार्यालये आणि घरांचीही झडती घेण्यात येत आहे.

त्याचा परिणाम देशातील सर्वात मोठी वायर आणि केबल कंपनी पॉलीकॅब इंडियाच्या शेअर्सवरही दिसून येत आहे. शेअर बाजारात कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांनी घसरून 5450.00 रुपयांवर आले आहेत. (Polycab India shares fall)

गेल्या तीन महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये सात टक्क्यांची वाढ झाली आहे. एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 110 टक्के वाढ झाली आहे. Polycab India Ltd कंपनी इलेक्ट्रिकल वस्तू म्हणजेच घरात वापरल्या जाणाऱ्या विजेशी संबंधित वस्तू बनवते.

कंपनी इलेक्ट्रिकल वायर, कंट्रोल केबल्स, पॉवर केबल्स, बिल्डिंग वायर्स, इंस्ट्रुमेंटेशन केबल्स, पंखे तसेच दिवे तयार करते. (Polycab India Income Tax raids at 50 locations)

Polycab India shares fall after Income Tax raids at 50 locations
स्वस्त सोन्यात गुंतवणूक करण्याचा आज शेवटचा दिवस; सरकार 10 ग्रॅम सोन्यावर देत आहे मोठी सूट

सप्टेंबर 2023मध्ये पॉलीकॅब इंडियाने 436.89 कोटी निव्वळ नफा कमावला होता, जो मागील वर्षाच्या तुलनेत 58.5 टक्के वाढला होता. कंपनीचा महसूल 27 टक्क्यांनी वाढून 4,253 रुपयांवर पोहोचला होता. (Income Tax raids)

असा आहे कंपनीचा इतिहास

1964 मध्ये स्वर्गीय ठाकूरदास जयसिंघानी यांनी 'सिंध इलेक्ट्रिक स्टोअर्स' ची स्थापना केली. ज्यामध्ये पंखे, स्विच आणि वायर्ससह विविध विद्युत उत्पादने तयार केली.

Polycab India shares fall after Income Tax raids at 50 locations
Layoff: १००हून अधिक स्टार्टअप कंपन्यांनी १५ हजार कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

त्यानंतर 1968 पासून कौटुंबिक व्यवसायाचे व्यवस्थापन स्वर्गीय ठाकूरदास जयसिंघानी यांचे पुत्र गिरधारी टी. जयसिंघानी, इंदर टी. जयसिंघानी, अजय टी. जयसिंघानी आणि रमेश टी. जयसिंघानी यांनी केले. कुटुंबाने भारतीय भागीदारी कायदा, 1932 अंतर्गत 'ठाकूर इंडस्ट्रीज' नावाने भागीदारी फर्मची स्थापन केली होती.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()