Small Cap Stock: स्मॉलकॅप पॉवर सेक्टरचा 'हा' शेअर देईल जबरदस्त परतावा, कसा ते जाणून घ्या

CESC Share Price: विजेच्या मागणीत वाढ झाल्यामुळे वीज निर्मिती आणि वितरण कंपन्यांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळेच ब्रोकरेज फर्मने स्मॉलकॅप पॉवर जनरेशन कंपनी सीइएससी लिमिटेडचे (CESC Ltd) शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
power stocks to buy cesc share know target by sharekhan 55 percent return in 2023
power stocks to buy cesc share know target by sharekhan 55 percent return in 2023 Sakal
Updated on

CESC Share Price: पॉवर सेक्टरच्या शेअर्समध्ये यावर्षी प्रचंड वाढ दिसून आली. विजेच्या मागणीत वाढ झाल्यामुळे वीज निर्मिती आणि वितरण कंपन्यांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळेच ब्रोकरेज फर्मने स्मॉलकॅप पॉवर जनरेशन कंपनी सीइएससी लिमिटेडचे (CESC Ltd) शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर सध्या 119 रुपयांवर ट्रेड करत आहे.

पॉवर डिमांड आउटलुक मजबूत दिसत आहे. कंपनीच्या कमाईत सुधारणा झाली आहे. शिवाय रिन्यूएबल एनर्जीवरही कंपनीचा फोकस आहे. पुढील 4-5 वर्षांत 3GW च्या RE साठी 12-13 हजार कोटीच्या कॅपिटल एक्सपेंडिचरची योजना आहे.

राजस्थान, मालेगाव आणि चंदीगडचा डिस्ट्रीब्यूशन बिझनेस टर्नअराउंडच्या तयारीत आहे. जे गुंतवणूकदारांसाठी लॉन्ग टर्म व्हॅल्यू क्रिएट करेल. त्यामुळेच ब्रोकरेज फर्म शेअरखानने या वीज निर्मिती कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

शिवाय 150 रुपयांचे टारगेट दिले आहे. हा शेअर सध्या 119 रुपयांवर आहे. सध्याच्या पातळीपेक्षा टारगेट प्राइस 26 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. नोव्हेंबर महिन्यात ब्रोकरेजने या स्टॉकसाठी 105 रुपयांचे टारगेट दिले होते.

power stocks to buy cesc share know target by sharekhan 55 percent return in 2023
Bank Holidays: नवीन वर्षात किती दिवस बँका राहणार बंद? पाहा संपूर्ण यादी

सीइएससीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 128 रुपये आहे जो आतापर्यंतचा उच्चांक आहे. 52 आठवड्यांचा नीचांक 62 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 15800 कोटी आहे. हा शेअर एका महिन्यात 20 टक्के आणि तीन महिन्यांत 31 टक्क्यांनी वाढला आहे. या स्टॉकने 2023 मध्ये 55 टक्के परतावा दिला आहे.

power stocks to buy cesc share know target by sharekhan 55 percent return in 2023
Small Cap Stock: 'या' स्मॉलकॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, कोणते आहेत हे शेअर्स?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.