Multibagger Stock Update: संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या मोठ्या ऑर्डरमुळे 'या' शेअरमध्ये तुफान तेजी

कंपनीच्या शेअर्समध्ये 2.56 टक्क्यांनी वाढ होऊन तो 490.65 रुपयांवर बंद झाला.
Defence Stock
Defence Stockesakal
Updated on

Multibagger Stock Update: शेअर बाजारात सजग राहून गुंतवणूक केली तर यात तुम्हाला भरघोस परतावा मिळू शकतो. तुम्ही अशात गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल, तर प्रीमियर एक्सप्लोसिव्ह (Premier Explosives) शेअर्सचा विचार करु शकता.

या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना शॉर्ट टर्ममध्ये चांगला परतावा दिला आहे. नुकतीच कंपनीच्या शेअर्समध्ये 2.56 टक्क्यांनी वाढ होऊन तो 490.65 रुपयांवर बंद झाला. यासह कंपनीचे मार्केट कॅप 527.56 कोटी रुपये झाले आहे.

या मायक्रो कॅप कंपनीला अलीकडेच भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून अनेक मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत. कंपनीला 76.78 कोटी रुपयांची (जीएसटीसह) मोठी ऑर्डर मिळाल्याचे प्रीमियर एक्स्प्लोझिव्हजने स्टॉक एक्स्चेंजला कळवले आहे.

यानुसार संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत वायुसेना मुख्यालय (वायू भवन), नवी दिल्ली यांनी कंपनीला 50 एमएम एमटीव्ही फ्लेअर्स पुरवण्याचे काँट्रॅक्ट दिले आहे. कंपनीला लेटर ऑफ एक्सेप्टेन्सपासून 12 महिन्यांच्या कालावधीत ऑर्डर पूर्ण करायची आहे.

याव्यतिरिक्त, कंपनीने संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत भारत सरकारच्या एंटरप्रायझेस भारत डायनॅमिक्स लिमिटेडकडून मिळालेल्या 9.73 कोटी रुपयांच्या (जीएसटीसह) ऑर्डरचाही खुलासा केला. ही ऑर्डरही 12 महिन्यांत पुर्ण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

प्रीमियर एक्स्प्लोझिव्हज इंडस्ट्रियल एक्सप्लोसिव्ह्स आणि डिटोनेटर्सच्या मॅन्युफॅक्चरिंगचे काम करते. या शेअरने गेल्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 13% परतावा दिला आहे.

Defence Stock
Share Market Today: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या 6 महिन्यांत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात हा स्टॉक 61 टक्क्यांनी वाढला आहे.

गेल्या 2 वर्षांत, त्याच्या गुंतवणूकदारांना 170% परतावा मिळाला आहे. इतकेच नाही तर गेल्या तीन वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये 263 टक्क्यांची जबरदस्त तेजी दिसून आली आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Defence Stock
Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.