Multibagger Stock: सरकारी वीज निर्मिती कंपनी एसजेवीएन लिमिटेडच्या (SJVN Ltd) शेअर्समध्ये सध्या चांगली वाढ दिसून येत आहे. एसजेवीएनच्या शेअर्समधील ही वाढ भारत आणि नेपाळमधील 4 हायड्रो आणि रिन्युअल प्रोजेक्टसाठी JV करण्यासाठी DIPAM कडून मंजुरी मिळाल्याच्या बातमीमुळे झाली आहे.
या शेअर्सने 1 वर्षात 168 टक्के परतावा दिला आहे. अशात ब्रोकरेज हाऊस मोनार्क नेटवर्थ कॅपिटलने या शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
बीएसईला दिलेल्या माहितीनुसार, एसजेवीएन लिमिटेडला भारत आणि नेपाळमध्ये पॉवर प्रोजेक्ट्स उभारण्यासाठी चार संयुक्त कंपन्या स्थापन करण्यासाठी वित्त मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. एकूण 8,778 मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत आणि रिन्युअल प्रोजेक्ट्सच्या विकासासाठी हे संयुक्त उपक्रम तयार केले जातील.
DIPAM ने एसजेवीएन आणि ऊर्जा मंत्रालयाच्या भारत आणि नेपाळमधील जलविद्युत आणि नवीकरणीय प्रकल्पांच्या विकासासाठी चार संयुक्त उपक्रम कंपन्या स्थापन करण्याच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे.
ब्रोकिंग फर्म मोनार्क नेटवर्थ कॅपिटलने एसजेवीएनचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजने एसजेवीएनच्या शेअरसाठी 125 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे. तुम्हाला सध्याच्या किंमतीतून 37.4 टक्के परतावा मिळू शकतो. या शेअरने एका महिन्यात 8 टक्के, 6 महिन्यांत 121 टक्के आणि एका वर्षात 168 टक्के उत्कृष्ट परतावा दिला आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.