PNB: सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank or PNB) 27 डिसेंबला बेसल-III ऍडिशनल टियर-1 बाँड जारी करून 3000 कोटी उभारण्याची योजना बनवत असल्याचे बाजारातील सूत्रांकडून समजत आहे.
या इश्यूमध्ये 500 कोटीची बेस साइज आणि 2,500 कोटीचा ग्रीनशूचा पर्याय समाविष्ट आहे.
बाँडला वाटपाच्या डीम्ड तारखेच्या पाचव्या वर्धापनदिनी किंवा त्यानंतरच्या कोणत्याही वर्धापनदिनाच्या दिवशी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) पूर्व परवानगीने कॉलचा पर्याय आहे.
पीएनबीने बॉण्ड्ससाठी 2 डिसेंबर ही पेमेंट तारीख निश्चित केली आहे. ही तारीख आहे जेव्हा इश्यूअर आणि गुंतवणूकदार यांच्यात फंड आणि बाँडची देवाणघेवाण होते. इंडिया रेटिंग्ज, केअरआणि क्रिसिलद्वारे बॉन्ड्सना 'स्टेबल' आउटलुकसह 'AA+' रेट केले आहे. या बॉन्ड्ससाठी अर्जाचा किमान आकार 1 कोटी आणि 1 कोटीच्या मल्टीपलमध्ये आहे.
21 डिसेंबरला अर्थात गुरुवारी सकाळी बीएसईवर पंजाब नॅशनल बँकेचे शेअर्स 85.82 रुपयांच्या घसरणीसह उघडले. पण लवकरच तो 90.18 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला, मागील बंद किंमतीपेक्षा सुमारे 4 टक्के वाढ नोंदवली.
शेअर 86.05 रुपयांवर उघडला आणि एनएसईवर(NSE) 90.15 रुपयांचा उच्चांक गाठला. गेल्या एका वर्षात पीएनबीच्या शेअर्समध्ये 63 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. व्यवहाराच्या शेवटी हा शेअर 3 टक्क्यांहून अधिक वाढीसह 90 रुपयांच्या आसपास स्थिरावला.
नोंद - क्रिप्टो मार्केट(Crypto Market), शेअर मार्केट(Share market) किंवा म्युच्युअल फंडातील(Mutual Fund) गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.