Jawan: शाहरुखच्या 'जवान'मुळे गुंतवणूकदार होऊ शकतात मालामाल, 'या' कंपनीचे शेअर्स वाढण्याची शक्यता

PVR-Inox Share Price: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित 'जवान' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
PVR-Inox share price shahrukh khans jawan films will rise shares in pvr inox
PVR-Inox share price shahrukh khans jawan films will rise shares in pvr inox Sakal
Updated on

PVR-Inox Share Price: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित 'जवान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याचा अंदाज चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगवरूनच लावता येतो. शनिवारपासून चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. अवघ्या 24 तासांत या चित्रपटाने 305 हजार तिकिटांच्या विक्रीसह 10 कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा ओलांडला आहे.

अशी अपेक्षा आहे की जवान 100 कोटींचा टप्पा पार करेल. या आशेमुळे गुंतवणूकदारांना शेअर बाजारातही चांगली कमाई करता येईल. शाहरुखच्या जवानची जादू बाजारावरही प्रभाव पाडू शकते. पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

आत्तापर्यंत, पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअर्सवर गदर 2 चा प्रभाव होता. जवान चित्रपटामुळे पीव्हीआर आयनॉक्सचे शेअर्स वाढू शकतात. शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. याआधी जानेवारी महिन्यात पठाण रिलीज झाला तेव्हा PVR शेअर्समध्ये अवघ्या तीन दिवसांत 7 टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती.

11 ऑगस्टपासून आतापर्यंत पीव्हीआरच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार 10 ऑगस्ट रोजी पीव्हीआर आयनॉक्सचे शेअर्स 1,631.15 रुपयांवर आणि 11 ऑगस्टला ते 1,636.85 रुपयांवर बंद झाले. आज कंपनीच्या शेअर्सने 1,800 रुपयांचा आकडा गाठला आहे. गदर 2 ची सततची क्रेझ आणि जवानाचे रेकॉर्ड प्री-बुकिंग हे यामागचे कारण आहे.

PVR-Inox share price shahrukh khans jawan films will rise shares in pvr inox
SBI Bank: ग्राहकांच्या संमतीशिवाय खात्यातून पैसे काढल्याचा SBI वर आरोप, बँकेने दिले स्पष्टीकरण

जवानाची पहिल्या दिवशीची ओपनिंग जवळपास 60 ते 70 कोटी रुपयांची असू शकते. तज्ञांच्या मते, त्याचा फायदा पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअर्सला होऊ शकतो. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्ये 7 ते 10 टक्क्यांची वाढ दिसू शकते.

येत्या दोन आठवड्यात हा आकडा दुप्पट होऊ शकतो. याचा अर्थ असा की कंपनीचा शेअर 2,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो आणि 52 आठवड्यांचा (1,974.75) शेअरचा रेकॉर्ड मोडू शकतो.

PVR-Inox share price shahrukh khans jawan films will rise shares in pvr inox
Kotak Mahindra Bank: उदय कोटक यांंनी राजीनामा देताच आज बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण, काय झाला परिणाम?

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.