IPO News: पिरॅमिड टेक्नोप्लास्टचा IPO 18 ऑगस्टला होणार खुला, कंपनीची संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Pyramid Technoplast IPO: आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 16.99 कोटी होता
IPO
IPO Sakal
Updated on

Pyramid Technoplast IPO: प्लॅस्टिक ड्रम निर्माता पिरॅमिड टेक्नोप्लास्टचा आयपीओ 18 ऑगस्टला सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. या महिन्यातील हा चौथा आयपीओ असेल. पिरॅमिड टेक्नोप्लास्टच्या (Pyramid Technoplast) आयपीओ अंतर्गत नवीन शेअर्स जारी केले जातील आणि प्रमोटर्स ऑफर फॉर सेल (OFS) विंडोद्वारे शेअर्स विकतील.

पिरॅमिड टेक्नोप्लास्टचा आयपीओ 153.05 कोटीचा असणार आहे. 18-22 ऑगस्टदरम्यान हा या इश्यू सुरु असेल. याअंतर्गत, तुम्ही 151-166 च्या प्राइस बँड आणि 90 शेअर्सच्या लॉटमध्ये गुंतवणूक करू शकता.

आयपीओनंतर, शेअर्सचे ऍलॉटमेंट 25 ऑगस्टला होईल. या इश्यूचे रजिस्ट्रार बिगशेअर सर्व्हिसेस आहेत. यानंतर बीएसई आणि एनएसईवर 30 ऑगस्टला हे शेअर्स लिस्ट होतील.

आयपीओअंतर्गत 55 लाख नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. याशिवाय 10 रुपये फेस व्हॅल्यूचे 37.20 लाख शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) विंडोद्वारे विकले जातील.

कंपनीचे प्रमोटर्स क्रेडेन्स फायनान्शिअल कन्सल्टन्सी एलएलपी, ऑफर फॉर सेलद्वारे आपले शेअर्स विकणार आहेत. फ्रेश शेअर्सद्वारे उभारलेल्या पैशांपैकी 40 कोटी कर्ज फेडण्यासाठी वापरले जातील आणि 40.2 कोटी रुपये वर्किंग कॅपिटलसाठी ठेवले जातील.

IPO
Made in India: मोदी सरकारचा मोठा निर्णय! गुगलशी स्पर्धा करण्यासाठी उभारणार 'आत्मनिर्भर' वेब ब्राउझर

पिरॅमिड टेक्नोप्लास्ट रासायनिक आणि फार्मा कंपन्यांद्वारे वापरले जाणारे प्लास्टिकचे ड्रम्स तयार करते. 1998 मध्ये त्यांनी कमर्शियल प्रॉडक्शन सुरु केले, आणि आता त्यांचे सहा मॅन्युफॅक्चरींग प्लांट्स आहेत.

चार गुजरातमधील भरूच इथे आणि दोन दादरा आणि नगर हवेलीच्या सिल्वासा इथे आहेत. आता ते भरुचमध्ये आणखी एक प्लांट सुरु करणार आहेत.

गेल्या तीन आर्थिक वर्षांत कंपनी सातत्याने मजबूत झाली आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये, त्याचा निव्वळ नफा 16.99 कोटी होता, जो पुढील आर्थिक वर्ष 2022 मध्ये वाढून 26.1 कोटी झाला.

IPO
Gautam Adani: ...यामुळे गौतम अदानी Adani Wilmar मधील 44% टक्के हिस्सा विकण्याच्या तयारीत

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.