Rajputana Industries IPO : राजपुताना इंडस्ट्रीजचा आयपीओ खुला, जाणून घ्या डिटेल्स...

latest news of Rajputana Industries IPO | एका अर्जासह किमान लॉट साईज 3000 शेअर्सची आहे. रिटेल अर्थात किरकोळ गुंतवणूकदारांसाठी किमान गुंतवणूक रक्कम 1 लाख 14 हजार रुपये आहे.
Rajputana Industries IPO Open Know Details share market investment opportunity
Rajputana Industries IPO Open Know Details share market investment opportunitySakal
Updated on

राजपुताना इंडस्ट्रीजचा (Rajputana Industries) आयपीओ आज अर्थात 30 जुलैपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे आणि आयपीओ 1 ऑगस्टला बंद होईल. राजपुताना इंडस्ट्रीज आयपीओसाठी प्राइस बँड 36-38 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे.

एका अर्जासह किमान लॉट साईज 3000 शेअर्सची आहे. रिटेल अर्थात किरकोळ गुंतवणूकदारांसाठी किमान गुंतवणूक रक्कम 1 लाख 14 हजार रुपये आहे. आयपीओचे शेअर ऍलॉटमेंट 2 ऑगस्ला निश्चित केले जाईल. 5 ऑगस्टला डीमॅट खात्यात शेअर क्रेडिट किंवा रिफंड शक्य आहे. कंपनीने 6 ऑगस्टला एनएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर आपले शेअर्स लिस्ट करेल असा अंदाज आहे.

हा आयपीओ 23.88 कोटीचा बुक बिल्ट इश्यू आहे. हा 62.85 लाख शेअर्सचा फ्रेश इश्यू आहे. कंपनीचे प्रमोटर मेसर्स शेरा एनर्जी लिमिटेड, मेसर्स ईशा इन्फ्रा पॉवर प्रायव्हेट लिमिटेड, शिवानी शेख आणि शेख नसीम आहेत. होलानी कंसल्टेंट्स प्रायव्हेट लिमिटेड हे राजपुताना इंडस्ट्रीज आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहे. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.

Rajputana Industries IPO Open Know Details share market investment opportunity
Seagull India's IPO : 1 ऑगस्टला खुला होणार सीगल इंडियाचा आयपीओ, तुम्ही तयार आहात का ?

राजपुताना इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, ग्रिड सोलर पावर जनरेटिंग सिस्टम खरेदी करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी या आयपीओमधून मिळालेल्या उत्पन्नाचा वापर करेल.

राजपुताना इंडस्ट्रीज लिमिटेड 2011 मध्ये स्थापित, तांबे, ॲल्युमिनियम, पितळ आणि रिसायकल्ड केलेल्या स्क्रॅप धातूपासून विविध मिश्र धातुंमध्ये नॉन-फेरस धातू उत्पादनांची विस्तृत श्रेणी तयार करते. कंपनी खुल्या बाजारातून खरेदी केलेल्या भंगार धातूपासून ॲल्युमिनियम, तांबे किंवा पितळ इत्यादी धातूंचे बिलेट बनवते.

Rajputana Industries IPO Open Know Details share market investment opportunity
Trom Industries IPO : ट्रॉम इंडस्ट्रीजच्या आयपीओला शानदार सबस्क्रिप्शन, आज शेवटचा दिवस शिल्लक ?

राजस्थानमधील सीकरयेथील कंपनीच्या स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये रिसायकलिंगद्वारे भंगार धातूची बिलेट्समध्ये प्रक्रिया केली जाते. कंपनी या बिलेट्सची विविध उत्पादन कंपन्यांना विक्री करते किंवा त्यांचा वापर कॉपर रॉड्स, ॲल्युमिनियम रॉड्स, कॉपर मदर ट्यूब्स, ब्रास वायर्स, सुपर-इनॅमल्ड कॉपर कंडक्टर आणि इतर अनेक उत्पादनांसाठी करते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.