IPO News: पैसे कमवण्याची सुवर्णसंधी! 600 कोटी रुपयांचा IPO येतोय, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rashi Peripherals IPO: राशी पेरिफेरल्सचा आयपीओ 7 फेब्रुवारीला खुला होणार आहे. या इश्यूद्वारे 600 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. 9 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी असेल.
Rashi Peripherals 600-crore IPO opens on February 7 Details here
Rashi Peripherals 600-crore IPO opens on February 7 Details here Sakal
Updated on

Rashi Peripherals IPO: राशी पेरिफेरल्सचा आयपीओ 7 फेब्रुवारीला खुला होणार आहे. या इश्यूद्वारे 600 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. 9 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी असेल. त्याच वेळी, हा आयपीओ 6 फेब्रुवारीला अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल.

राशी पेरिफेरल्सच्या आयपीओअंतर्गत 600 कोटीचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जातील. त्याच वेळी, ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत कोणतीही विक्री होणार नाही. आधी आयपीओची साईज 750 कोटी होती, जी प्री-आयपीओ प्लेसमेंटमध्ये निधी उभारल्यानंतर आता कमी होऊन 600 कोटी झाली आहे.

व्होल्राडो व्हेंचर पार्टनर्स फंड-III-बीटा आणि माधुरी मधुसूदन केला यांनी 17 जानेवारी 2024 रोजी प्री प्रायव्हेट प्लेसमेंटद्वारे कंपनीमध्ये अनुक्रमे 100 कोटी आणि 50 कोटीची गुंतवणूक केली. व्होल्राडो आणि केला हे कंपनीचे 10.35 टक्के शेअर्स असलेले एकमेव सार्वजनिक भागधारक आहेत, तर बाकी 89.65 टक्के शेअर्स प्रमोटर्सकडे आहेत.

या आयपीओमधून मिळणारे 326 कोटी कर्जाची परतफेड करण्यासाठी तर खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी 220 कोटी खर्च करेल. नोव्हेंबर 2023 पर्यंत कंपनीचे एकूण थकित कर्ज रुपये 1,569.4 कोटी आहे. जेएम फायनान्शिअल आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज या इश्यूसाठी बुक-रनिंग लीड मॅनेजर आहेत.

Rashi Peripherals 600-crore IPO opens on February 7 Details here
BMC Budget 2024: मुंबईकरांसाठी आज BMCची तिजोरी उघडणार; पायाभूत सुविधा आणि पर्यावरणावर भर देण्याची शक्यता

कृष्णकुमार चौधरी आणि सुरेशकुमार पानसारी यांनी 1989 मध्ये कंपनीची स्थापना केली होती. राशी पेरिफेरल्स सप्टेंबर 2022 पर्यंत भारतातील 730 ठिकाणी 50 शाखा आणि 62 गोदामे चालवते.

कंपनी पर्सनल कंप्यूटिंग डिवाइस, एंटरप्राइझ सोल्यूशन्स, एम्बेडेड डिझाइन आणि उत्पादने आणि क्लाउड कंप्यूटिंग डिस्ट्रिब्यूट करते.

Rashi Peripherals 600-crore IPO opens on February 7 Details here
Meta Dividend: फेसबुक पहिल्यांदाच देणार डिव्हिडंड, मार्क झुकरबर्गला मिळणार 5,800 कोटी रुपये

दुसरे वर्टिकल लाइफस्टाइल आणि आयटी एसेंशियल आहे, ज्या अंतर्गत ते ग्राफिक कार्ड्स, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट्स आणि मदरबोर्ड, स्टोरेज आणि मेमरी डिव्हाइसेस, लाइफस्टाइल पेरिफेरल्स आणि ॲक्सेसरीज, पॉवर इक्विपमेंट आणि नेटवर्किंग आणि मोबिलिटी डिव्हाइसेस डिस्ट्रिब्यूट करते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()