FirstCry कंपनीला रतन टाटांनी केला 'टाटा'; विकणार 77,900 शेअर्स, काय आहे कारण?

FirstCry IPO: चाइल्ड केअर प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी Firstcry आपला IPO लॉन्च करणार आहे. कंपनीने IPO साठी प्राथमिक कागदपत्रे SEBI कडे दाखल केली आहेत. IPO मध्ये नवीन इश्यू आणि ऑफर फॉर सेल (OFS) दोन्ही असतील.
Ratan Tata To Sell 77,900 Shares In The Upcoming FirstCry IPO know reason
Ratan Tata To Sell 77,900 Shares In The Upcoming FirstCry IPO know reason Sakal
Updated on

FirstCry IPO: चाइल्ड केअर प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी Firstcry आपला IPO लॉन्च करणार आहे. कंपनीने IPO साठी प्राथमिक कागदपत्रे SEBI कडे दाखल केली आहेत. IPO मध्ये नवीन इश्यू आणि ऑफर फॉर सेल (OFS) दोन्ही असतील. अनेक बडे शेअरहोल्डर्स ऑफर फॉर सेलमध्ये कंपनीतील आपली हिस्सेदारी कमी करण्याच्या तयारीत आहेत. त्यात टाटा समूहाचेही नाव आहे.

टाटा आपला संपूर्ण हिस्सा विकणार आहे. त्यांनी 2016 मध्ये 66 लाख रुपये गुंतवून भागभांडवल खरेदी केले होते. त्यांच्याकडे कंपनीचे 77,900 शेअर्स किंवा 0.02 टक्के हिस्सा आहे. आयपीओसाठी दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये ही माहिती समोर आली आहे.

कागदपत्रांनुसार, पुणेस्थित कंपनीच्या IPO मध्ये 1,816 कोटी रुपयांपर्यंतचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील आणि विद्यमान भागधारकांद्वारे 5.44 कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) दिसेल. IPO चा एकूण आकार आणि इश्यू किंमत याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही.

ऑफर फॉर सेलमध्ये शेअर्स विकणाऱ्यांपैकी महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) 28 लाख शेअर्स विकणार आहे. गुंतवणूक बँक सॉफ्टबँक देखील 2.03 कोटी शेअर्स विकणार आहे. अलीकडेच सॉफ्टबँकने कंपनीतील 630 कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत.

Ratan Tata To Sell 77,900 Shares In The Upcoming FirstCry IPO know reason
Azad Engineering: आझाद इंजिनीअरिंगच्या IPOची धमाकेदार एन्ट्री, शेअर्स 37.50 टक्के प्रीमियमवर लिस्ट

IPO कधी उघडणार?

SEBI ला सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये, FirstCry ची मूळ कंपनी Brainbees ने IPOची तारीख सांगितली नाही. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीचा IPO 2024 च्या सुरुवातीला बाजारात येऊ शकतो. यासोबतच कंपनीने आयपीओमधील शेअर्सची किंमत निश्चित केलेली नाही. आगामी काळात कंपनी IPO शी संबंधित अधिक माहिती देईल.

Ratan Tata To Sell 77,900 Shares In The Upcoming FirstCry IPO know reason
Share Market: 4,52,00,000 रुपयांचा एक शेअर, हा आहे जगातील सर्वात महागडा शेअर

2022-2023 या आर्थिक वर्षात, वाढत्या खर्चामुळे FirstCry चा तोटा सहा पटीने वाढला आहे. कंपनीने सांगितले की, IPO मधून उभारलेल्या निधीचा उपयोग ती भारत आणि सौदी अरेबियामधील स्टोअर्सचा विस्तार करण्यासाठी करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.