Demat Account: डी-मॅट खात्यांमध्ये विक्रमी वाढ; मे महिन्यात 21 लाख नव्या खातेदारांची नोंद

डी-मॅट खात्यांची एकूण संख्या १.१८ कोटींवर पोहोचली आहे.
Demat Account
Demat AccountSakal
Updated on

मुंबई, ता. ६ : सध्या शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्याकडे कल वाढत असून, नवे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात येत असल्याचे डी-मॅट खात्यांच्या संख्येवरून स्पष्ट झाले आहे. मे महिन्यात २१ लाख नवी डी-मॅट खाती उघडण्यात आली आहेत. या वर्षातील ही विक्रमी मासिक आकडेवारी आहे.

राष्ट्रीय शेअर डिपॉझिटरी लि.(एनएसडीएल) आणि केंद्रीय शेअर डिपॉझिटरी लि. (सीडीएसएल) या संस्थांनी जारी केलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. आता डी-मॅट खात्यांची एकूण संख्या १.१८ कोटींवर पोहोचली आहे.

गेल्या तीन महिन्यांत दोन लाखांपेक्षा कमी डी-मॅट खाती उघडण्यात आली होती. एप्रिलमध्ये १६ लाख खाती उघडण्यात आली. डिसेंबर २०२० नंतरची ती सर्वांत कमी संख्या होती. मासिक पातळीवर १.८ टक्के, तर र्वाषिक स्तरावर २५ टक्के वाढ आहे.

गेल्या दोन महिन्यांत शेअरवरील आकर्षक परताव्यामुळे नव्या गुंतवणूकदारांना प्रोत्साहन मिळत आहे. ते शेअर बाजाराकडे आकर्षित होत असून, गुंतवणूक करण्यासाठी डी-मॅट खाती सुरू करत आहेत. आयपीओ आणि शेअरनी उत्तम कामगिरी करत भरभरून परतावा दिला आहे.

त्याचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. जागतिक वातावरणामुळे या वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांत भारतीय शेअर बाजारात मंदीचाच कल होता. मात्र, नंतर बाजारात सकारात्मक कल परतला.

गेल्या दोन महिन्यांत स्थिर व्याजदर, कमी चलनवाढ, जागतिक स्थिरता आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण यामुळे मिड कॅप शेअरने चांगला परतावा दिला.

एप्रिलमध्ये भारतीय शेअर बाजाराने जागतिक बाजारापेक्षा चार टक्क्यांनी, तर मे महिन्यात तीन टक्क्यांनी चांगली कामगिरी केली.

Demat Account
India GDP: अजय बंगा जागतिक बँकेचे अध्यक्ष होताच भारताला मोठा धक्का; विकास दरात...

याशिवाय रिझर्व्ह बँकेने व्याजदरांबाबत घेतलेल्या धोरणांनीही बाजारातील तेजीला चालना दिल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरमधील वाढीसह ‘एसएमई आयपीओं’ना मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादाने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे नवे गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळत आहे. मध्यम ते दीर्घकाळ हाच तेजीचा कायम राहील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

ठळक वैशिष्ट्ये :

  • मे महिन्यात २१ लाख नवी डी-मॅट खाती

  • खात्यांची एकूण संख्या १.१८ कोटींवर

  • एप्रिलमध्ये १६ लाख नवी खाती

  • आयपीओ, मिडकॅप, स्मॉलकॅप शेअरची उत्तम कामगिरी

  • भारतीय बाजारात मे महिन्यात जागतिक बाजारापेक्षा तीन टक्के वाढ

Demat Account
Shivrajyabhishek Sohala : हिंदवी स्वराज्याची स्थापना केवळ राजकीय सत्तेसाठी केली नव्हती, हा तर भारतीयत्वाचा अरुणोदय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.