Demat Account: गुंतवणूकदारांचा कल शेअर बाजाराकडे, ऑगस्ट महिन्यात इतक्या नव्या डी-मॅट खात्यांची झाली नोंद

Demat Account: जानेवारी २०२२ नंतरची ही सर्वोच्च संख्या आहे.
Demat Account
Demat AccountSakal
Updated on

Demat Account: शेअर बाजारातील तेजीमुळे मोठ्या प्रमाणात छोटे गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळले असून, ऑगस्ट महिन्यात ३१ लाखांहून अधिक नवी डी-मॅट खाती उघडण्यात आली आहेत. जानेवारी २०२२ नंतरची ही सर्वोच्च संख्या आहे. यामुळे आता एकूण डी-मॅट खात्याची संख्या १२.६६ कोटींच्या पुढे गेली आहे.

सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लि. (सीडीएसएल) आणि नॅशनल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लि. (एनएसडीएल) या दोन डिपॉझिटरीमध्ये जुलैमध्ये सुमारे ३० लाख नवी डी-मॅट खाती उघडण्यात आली होती.

त्या तुलनेत ऑगस्टमधील संख्येत २.४ टक्के वाढ झाली असून, गेल्या १२ महिन्यांतील सरासरी २० लाख खात्यांच्या तुलनेत ४७ टक्के वाढ झाली आहे. कोविडपूर्व काळातील संख्येच्या तुलनेत त्यात तिप्पट वाढ झाली आहे.

जगभरातील अस्थिर परिस्थितीतही भारतीय शेअर बाजाराने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ऑगस्टमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीने घसरण नोंदवली असली तरी स्मॉल-कॅप आणि मिड कॅप निर्देशांकांमध्ये चांगली वाढ झाली आहे.

‘निफ्टी मिड कॅप १००’ निर्देशांक ३.७ टक्क्यांनी वाढला आहे, तर ‘निफ्टी स्मॉल कॅप १००’ निर्देशांक ४.६ टक्क्यांनी वाढला आहे. अनेक मिड-कॅप शेअरनी आतापर्यंतचा उच्चांक नोंदवला असून, त्यांच्या व्यवहारांची संख्या वाढली आहे. आयपीओंची कामगिरीही सरस होत आहे.

यामुळे शेअर बाजाराकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. डेरिव्हेटिव्ह बाजारातही गुंतवणूकदारांची संख्या वाढत आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Demat Account
G20 Summit 2023: अंबानी-अदानींसह 500 उद्योगपती G20 मध्ये होणार सहभागी? PIB Fact Checkने सांगितले सत्य

आगामी काळात देशातील पायाभूत सुविधा, बांधकाम आदी क्षेत्रांत चांगली वाढ होऊ शकते. त्यामुळे शेअर बाजार झपाट्याने वाढण्याचा

अंदाज वर्तवला जात आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांची संख्या वाढण्यास आणखी चालना मिळेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Demat Account
RBI On I-CRR: RBI चा बँकांना मोठा दिलासा, I-CRR मागे घेण्याची केली घोषणा, सर्वसामान्यांवर काय होणार परिणाम?

जगभरातील अस्थिर परिस्थितीतही भारतीय शेअर बाजाराने उल्लेखनीय कामगिरी केली असून, स्मॉल-कॅप आणि मिड कॅप निर्देशांकांमध्ये चांगली वाढ झाली आहे.आयपीओंची कामगिरीही सरस होत आहे. यामुळे शेअर बाजाराकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. असे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()