Reliance Q4 Results: आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत देशातील सर्वात मोठी खाजगी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात घसरण झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा सुमारे 2 टक्क्यांनी घसरून 18,951 कोटी रुपयांवर आला आहे. यापूर्वी, कंपनीचा नफा 19,299 कोटी रुपये होता.
चौथ्या तिमाहीत, रिलायन्सचा ऑपरेशन्समधील महसूल 11 टक्क्यांनी वाढून 2.4 लाख कोटी रुपये झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत 2.16 लाख कोटी रुपये होता. रिलायन्स इंडस्ट्रीजनेही शेअरधारकांना प्रति शेअर 10 रुपये लाभांश जाहीर केला आहे.
स्टॉक एक्स्चेंजमध्ये नियामक फाइलिंगमध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीजने सांगितले की संपूर्ण आर्थिक वर्षासाठी कंपनीचा एकत्रित महसूल 2.6 टक्क्यांनी वाढून 1 लाख कोटी होता. कंपनीने सांगितले की, संपूर्ण आर्थिक वर्षातील करपूर्व नफा 1 लाख कोटींच्या पुढे गेला आहे आणि तो 1,04,727 कोटी आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 11.4 टक्के अधिक आहे.
‘रिलायन्स’ समूहातील विविध विभागांनी चांगली कामगिरी केली असून, पहिली भारतीय कंपनी ठरली आहे, जिने करपूर्व नफ्यात एक लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.
-मुकेश अंबानी, अध्यक्ष, रिलायन्स इंडस्ट्रीज
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये थोडी वाढ झाली आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 19 रुपयांच्या किंचित वाढीसह 2960.60 रुपयांवर बंद झाले. सोमवारी कंपनीचे शेअर्स 2,950 रुपयांवर उघडले.
ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचे शेअर्स 2964.30 रुपयांपर्यंत खाली आले होते. मात्र, चालू वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये 25 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप पुन्हा एकदा 20 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.