Reliance Demerger: बाजारात आला अंबानींचा नवा शेअर, किंमत रिलायन्स इंडस्ट्रीजपेक्षा 10 पट स्वस्त

बुधवारी बाजार बंद झाला तेव्हा बीएसईवर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 2,840 रुपये होती.
Mukesh Ambani Reliance Demerger
Mukesh Ambani Reliance DemergerSakal
Updated on

Reliance Demerger: स्टॉक एक्स्चेंजवरील विशेष प्री-ओपन कॉल लिलाव सत्राच्या समाप्तीनंतर, NSE वर Jio Financial च्या शेअरचे मार्केट प्राइस रुपये 261.85 प्रति शेअर केले गेले आहे. डिमर्जरच्या निर्णयानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 2,580 रुपयांपर्यंत घसरली.

रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंटच्या नावात होणार बदल

Reliance Industries Limitedने जाहीर केले आहे की रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचा डिमर्जर नंतरचा अधिग्रहण खर्च 4.68 टक्के आहे. रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे ​​आता जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (JFSL) असे नामकरण करण्यात आले आहे.

बुधवारी बाजार बंद झाला तेव्हा बीएसईवर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 2,840 रुपये होती. ही किंमत विचारात घेतल्यास, अधिग्रहन किंमत 133 रुपयांपर्यंत खाली आला आहे.

विशेष प्रो-ओपन ट्रेडिंग सत्र

आज सकाळी 09 ते 09:45 पर्यंत BSE आणि NSE वर विशेष प्रो-ओपन ट्रेडिंग सत्रामध्ये डिमर्ज्ड कंपनीचे बाजार मूल्य मोजले गेले. या अंतर्गत, सकाळी 10 वाजेपर्यंत Reliance Industries Limited च्या शेअरमध्ये कोणतेही सामान्य व्यवहार झाले नाहीत.

Jio Financial Services Limited चा प्रमुख निर्देशांकांमध्ये समावेश केला जाईल परंतु या शेअर्समधील व्यापार लिस्टिंग होईपर्यंत होणार नाही.

या स्टॉकची लिस्टिंग येत्या दोन ते तीन महिन्यांत होऊ शकते आणि असे मानले जाते की रिलायन्सच्या आगामी एजीएममध्ये (Annual General Meeting) याची घोषणा केली जाऊ शकते.

Mukesh Ambani Reliance Demerger
Tata Group Stock: टाटा ग्रुपच्या शेअरमध्ये 9 टक्के वाढ, तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर?

बुधवारपर्यंत म्हणजेच 19 जुलैपर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स धारण करणारे भागधारक 1:1 मध्ये JFSL शेअर्स प्राप्त करण्यास पात्र असतील. उदाहरणार्थ, जर तुम्ही 19 जुलैपर्यंत RIL चे 100 शेअर्स धारण केले तर तुम्हाला JFSL चे 100 शेअर्स मिळतील.

NSE Jio Financial चा तात्पुरता समावेश निफ्टी50, निफ्टी100, निफ्टी200, निफ्टी500 आणि आणखी 15 निर्देशांकांमध्ये केला जाईल. कंपनी सूचीबद्ध होईपर्यंत, जेएफएसएलच्या शेअरची किंमत तशीच राहील.

Mukesh Ambani Reliance Demerger
Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.