Mukesh Ambani: अंबानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत; मार्केट कॅपने गाठला नवीन उच्चांक

Reliance Industries: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठी वाढ होत आहे. आज सोमवारी सकाळी शेअर 2,729 रुपयांवर उघडला. यानंतर शेअरने 2800 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली. शेअर्सच्या वाढीमुळे कंपनीचे मार्केट कॅप 19 लाख कोटी रुपयांच्या जवळ पोहोचले आहे.
Reliance Industries
Reliance IndustriesSakal
Updated on

Reliance Industries: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठी वाढ होत आहे. आज सोमवारी सकाळी शेअर 2,729 रुपयांवर उघडला. यानंतर शेअरने 2800 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली. शेअर्सच्या वाढीमुळे कंपनीचे मार्केट कॅप 19 लाख कोटी रुपयांच्या जवळ पोहोचले आहे. असा रेकॉर्ड करणारी ही देशातील पहिली कंपनी आहे.

गेल्या एका महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर 9 टक्क्यांनी वाढले आहेत. तीन महिन्यांत 23 टक्के आणि एका वर्षात 20 टक्के वाढले आहेत. या शेअरने तीन वर्षांत 50 टक्के परतावा दिला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचे निकाल शुक्रवारी, 19 जानेवारी रोजी जाहीर केले.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर तिमाहीत एकत्रित नफा वार्षिक आधारावर 11 टक्क्यांनी वाढून 19,641 कोटी रुपये झाला आहे. या कालावधीत कंपनीचे उत्पन्न 3.2 टक्क्यांनी वाढून 2.48 लाख कोटी रुपये झाले आहे. जे एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 2.41 लाख कोटी रुपये होते.

Reliance Industries
PM Awas Yojana: मोदी सरकार गरिबांसाठी नवी आवास योजना आणण्याच्या तयारीत; निवडणुकीपूर्वी घोषणा होण्याची शक्यता

डिसेंबर तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा (EBITDA) वार्षिक 16.7 टक्क्यांनी वाढून 44,678 कोटी रुपये झाला आहे. कंपनीच्या सर्व व्यवसाय विभागात वाढ झाली आहे.

मार्केट कॅपमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर

टॉप 10 कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, भारती एअरटेल, एलआयसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी आणि एसबीआय यांचा क्रमांक लागतो.

Reliance Industries
Budget 2024: अर्थसंकल्पात अर्थमंत्री सामाजिक क्षेत्रातील योजनांवर भर देणार? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.