Reliance Industries Share: गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. तो 1,608.80 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरुन 1,254.85 रुपयांवर घसरला आहे. त्याचा RSI देखील 30च्या खाली आला आहे, याचा अर्थ या शेअरची जास्त विक्री झाली आहे.
दरम्यान, बाजारातील घसरणीकडे दुर्लक्ष करून रिलायन्सचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. हा शेअर भविष्यात मोठी वाढ दर्शवेल असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.