Reliance Jio IPO: देशातील सर्वात मोठा IPO लॉन्च करण्याच्या तयारीत अंबानी; जिओ मोडणार LICचा रेकॉर्ड

Reliance Jio IPO Launch Date: भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी देशातील सर्वात मोठा IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. रिलायन्स जिओने नुकतेच मोबाईलचे दर वाढवले ​​आहेत. तसेच, कंपनीने आपल्या 5G व्यवसायाचा विस्तार करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.
Reliance Jio IPO
Mukesh AmbaniSakal
Updated on

Reliance JIO IPO: भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी देशातील सर्वात मोठा IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. रिलायन्स जिओने नुकतेच मोबाईलचे दर वाढवले ​​आहेत. तसेच, कंपनीने आपल्या 5G व्यवसायाचा विस्तार करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की रिलायन्स जिओ आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे हे संकेत असू शकतात.

हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असू शकतो. काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की कंपनीचा आयपीओ पुढील वर्षाच्या सुरुवातीला येऊ शकतो. पुढील महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संभाव्य एजीएममध्ये जिओच्या आयपीओबाबतचे चित्र स्पष्ट होईल अशी विश्लेषक आणि उद्योग जगताला आशा आहे.

Reliance Jio IPO
Anil Ambani: अनिल अंबानींचे कर्ज राज्य सरकार फेडणार? MMRDAने स्पष्टचं सांगितलं

इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉम IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. अहवालात आयपीओच्या आकाराचे संकेत दिले आहेत आणि आयपीओचा आकार 55 हजार कोटी रुपयांपेक्षा मोठा असू शकतो.

LIC ने 21,000 कोटी रुपयांचा IPO आणला होता

सध्या देशातील सर्वात मोठ्या आयपीओचा विक्रम एलआयसीच्या नावावर आहे. सरकारी विमा कंपनी LIC ने मे 2022 मध्ये IPO आणला होता, ज्याचा आकार सुमारे 21 हजार कोटी रुपये होता. भारतातील सर्वात मोठ्या IPO च्या बाबतीत, LIC ने Paytm ची मूळ कंपनी One97 Communications चा विक्रम मोडला होता, कंपनीने नोव्हेंबर 2021 मध्ये 18,300 कोटी रुपयांचा IPO लॉन्च केला होता.

Reliance Jio IPO
Share Market: शेअर बाजारातील ऐतिहासिक तेजीबद्दल सरन्यायाधीशांनी व्यक्त केली चिंता; सेबीला दिल्या विशेष सूचना

आता दोन वर्षानंतर एलआयसीचा सर्वात मोठ्या आयपीओचा विक्रम मोडला जाऊ शकतो. हा रेकॉर्ड रिलायन्स जिओच्या आयपीओआधीही मोडला जाऊ शकतो.

दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल कंपनी ह्युंदाई देखील स्थानिक उपकंपनी Hyundai India चा IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Hyundai India ने IPO साठी SEBI कडे मसुदा दाखल केला आहे. मसुद्यानुसार Hyundai India चा IPO 25 हजार कोटी रुपयांपर्यंत असू शकतो.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.