IPO News: आज 'या' कंपनीची होणार IPO एन्ट्री, किंमतीसह सर्व माहिती एका क्लिकवर

Rishabh Instruments IPO: तुम्हाला जर IPO मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
ipo
ipoSakal
Updated on

Rishabh Instruments IPO: तुम्हाला जर IPO मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नाशिकची कंपनी ऋषभ इन्स्ट्रुमेंट्सचा IPO 30 ऑगस्ट म्हणजेच आज बुधवारी उघडत आहे.

तुम्ही यामध्ये 1 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकता. या IPO च्या माध्यमातून कंपनीने एकूण 490.78 कोटी रुपये गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

अशा परिस्थितीत, जर तुम्ही IPO मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर गुंतवणूक करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) फाइलिंगनुसार, ऋषभ इन्स्ट्रुमेंट्स IPO साठी किंमत बँड रुपये 418 ते 441 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे.

ipo
Multibagger Stock: 3 वर्षात 430% रिटर्न, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का 'हा' शेअर?

ऋषभ इन्स्ट्रुमेंट्सचा IPO

  • किंमत बँड: रु 418-441/शेअर

  • लॉट आकार: 34 शेअर्स

  • किमान गुंतवणूक: 14,994 रुपये

एका लॉटमध्ये 34 शेअर्स मिळतील. किमान किरकोळ गुंतवणूकदार रु.14,994 आहे. PO मध्ये, ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे 415.78 कोटी रुपये उभे केले जाऊ शकतात. यामध्ये कंपनीचे प्रवर्तक आणि विद्यमान गुंतवणूकदार शेअर्सची विक्री करतील.

ipo
Bharat Forge Share: भारत फोर्जची विक्रमी घोडदौड, कल्याणी राफेलला मिळालेल्या ऑर्डरमुळे शेअर्समध्ये तेजी

कंपनी कुठे गुंतवणूक करणार?

रिषभ इन्स्ट्रुमेंट्स कंपनी नवीन शेअर्सद्वारे उभारलेली रक्कम तिच्या विस्तारासाठी वापरणार आहे. DHRP मध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनी या पैशाचा वापर उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी करणार आहे. त्यामुळे आगामी काळात कंपनीच्या उत्पादन क्षमतेत वाढ होणार आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.