Multibagger Returns Factory: 1990 मध्ये टायर ऐवजी 1 शेअर खरेदी केला असता तर आज बंगला बांधला असता

सेन्सेक्सवर गेल्या एका वर्षात हा शेअर 45 टक्क्यांनी वाढला आहे.
MRF Share Price Crosses Rs 1-lakh Mark
MRF Share Price Crosses Rs 1-lakh MarkSakal
Updated on

MRF Share Price Crosses Rs 1-lakh Mark: MRF शेअर ने (MRF Stock) मंगळवारी इतिहास रचला आहे. MRF हा एक लाख रुपयांचा आकडा गाठणारा भारतातील पहिला शेअर ठरला आहे. बीएसईवर काल हा शेअर 98,939.70 वर होता.

आज हा शेअर 99,500 वर उघडला आणि सकाळच्या व्यापारात 1,00,300 रुपयांवर गेला. गेल्या वर्षभरात या शेअरमध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे.

सेन्सेक्सवर गेल्या एका वर्षात हा शेअर 45 टक्क्यांनी वाढला आहे. 17 जून 2022 रोजी MRF शेअर्सनी BSE वर 65,900.05 या 52 आठवड्यांची नीचांकी पातळी गाठली होती.

MRF चे शेअर्स बघितले तर 2000 साली शेअरची किंमत प्रति शेअर रु.1000 होती. तर 2012 मध्ये तो 10,000 रुपयांपर्यंत पोहोचला होता. यानंतर 2014 मध्ये हा शेअर 25,000 रुपयांपर्यंत पोहोचला.

त्यानंतर 2016 मध्ये तो 50,000 रुपयांवर पोहोचला. 2018 मध्ये 75,000 आणि आता एक लाख रुपयांचा आकडा पार केला आहे.

MRF कंपनी 1946 मध्ये सुरू झाली. सुरुवातीला कंपनी फुगे बनवायची. ही कंपनी मद्रास येथील रहिवासी केएमएम मप्पिलई यांनी सुरू केली होती. (Rs 11 share crosses 1,00,300 rs know why MRF stock is India's most expensive stock)

MRF Share Price Crosses Rs 1-lakh Mark
MRF Share: MRF कंपनीने रचला इतिहास, आता 1 शेअर खरेदी करण्यासाठी घ्यावं लागणार कर्ज!

त्यांनी मद्रास रबर फॅक्टरी (MRF) नावाची छोटी कंपनी सुरू केली. नंतर 1960 मध्ये कंपनीने टायर बनवण्यास सुरुवात केली. आज एमआरएफ ही देशातील सर्वात मोठी टायर बनवणारी कंपनी आहे.

एमआरएफचे देशात 2,500 हून अधिक वितरक आहेत. कंपनी 75 पेक्षा जास्त देशांमध्ये टायर निर्यात करते. कंपनीने आपल्या जाहिरातींमध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांसारख्या खेळाडूंचा समावेश केला आहे.

एमआरएफने 1993 मध्ये शेअर बाजारात प्रवेश केला. सुरुवातीला कंपनीच्या शेअरचा दर रु. 11 होता. कंपनीच्या शेअरचा दर जास्त असण्याचे एक कारण म्हणजे 1975 पासून शेअर स्प्लिट केला नाही. आज कंपनीचे मार्केट कॅप 41,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

MRF Share Price Crosses Rs 1-lakh Mark
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()