SBFC Finance IPO: आज खुला होणार SBFC Financeचा IPO, किंमतीपासून गुंतवणुकीपर्यंत सर्व माहिती एका क्लिकवर

SBFC Finance IPO: आयपीओच्या माध्यमातून 1,025 कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा मानस आहे.
SBFC Finance IPO
SBFC Finance IPOSakal
Updated on

SBFC Finance IPO: नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी एसबीएफसी फायनान्स (SBFC Finance) आता आपला आयपीओ आणणार आहे. 3 ऑगस्टला हा आयपीओ खुला होणार आहे. या माध्यमातून 1025 कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा मानस आहे.

या पब्लिक इश्यूमध्ये 7 ऑगस्टपर्यंत गुंतवणूक करता येईल. त्याच वेळी, अँकर गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ एक दिवस आधी म्हणजेच 2 ऑगस्टला उघडेल.

या इश्यू अंतर्गत 600 कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर जारी केले जातील. याशिवाय, कंपनीच्या प्रमोटर्सकडून 425 कोटींचे शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विकले जातील.

अर्पवुड पार्टनर्स इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायजर्स एलएलपी, अर्पवुड कॅपिटल आणि एट45 सर्व्हिसेज एलएलपी आपले शेअर्स विक्री करणार आहेत. या फ्रेश इश्यूमधून मिळणारी रक्कम कंपनी व्यवसायासह भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी वापरणार आहे.

एसबीएफसी फायनान्सने आयपीओमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 10.25 कोटी रुपयांचे शेअर्स राखून ठेवले आहेत.

रजिस्ट्रारकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल करण्यापूर्वी कंपनीने 2.72 कोटी इक्विटी शेअर्सच्या खासगी प्लेसमेंटद्वारे 150 कोटी रुपये आधीच उभे केले आहेत. यामुळे या इश्यूची साईज 150 कोटी रुपयांनी कमी होऊन 600 कोटींवर आली आहे.

SBFC Finance IPO
Digital Payment : डिजिटल व्यवहारांमध्ये तेरा टक्के वाढ

कंपनीने नोव्हेंबर 2022 मध्ये आयपीओसाठी कागदपत्र जमा केली होती, ज्यात 750 कोटींचा फ्रेश इश्यू आणि 850 कोटींचा ओएफएसचा समावेश होता.

आता मार्च 2023 मध्ये, त्याने दुसऱ्यांदा बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केले, ज्यामध्ये आयपीओचा आकार कमी करून 1200 कोटी रुपये करण्यात आला. गेल्या महिन्यात सेबीकडून त्याला मंजुरी मिळाली आहे.

SBFC Finance IPO
UPI Payment : रूपे क्रेडिट कार्डाद्वारे येस बँकेची यूपीआय सुविधा

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.