SBI Share : 900 रुपयांच्या पार जाईल एसबीआयचे शेअर्स, ब्रोकरेज हाऊसकडून नवे टारगेट

भारतीय शेअर बाजाराने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. यासोबतच बाजारातील अनेक शेअर्समध्येही मोठी वाढ झाली आहे. ज्यात बँकिंग शेअर्सचाही समावेश आहे. त्याच वेळी, शेअर बाजारात भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयमध्ये (SBI) तेजीचा कल आहे आणि अनेक ब्रोकरेज हाऊसही एसबीआयबाबत बुलिश आहे.
SBI Share
SBI Sharesakal
Updated on

भारतीय शेअर बाजाराने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. यासोबतच बाजारातील अनेक शेअर्समध्येही मोठी वाढ झाली आहे. ज्यात बँकिंग शेअर्सचाही समावेश आहे. त्याच वेळी, शेअर बाजारात भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयमध्ये (SBI) तेजीचा कल आहे आणि अनेक ब्रोकरेज हाऊसही एसबीआयबाबत बुलिश आहे. आता एका ब्रोकरेज हाऊसने एसबीआयला 900 रुपयांपेक्षा जास्त टारगेट दिले आहे.

1 मार्च रोजी एसबीआयच्या शेअरमध्ये दमदार वाढ झाली. एनएसईवर 21.90 रुपयांच्या (2.93%) वाढीसह शेअर 770 वर बंद झाला. यासह, गेल्या एका महिन्यात स्टॉकमध्ये 18% वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत स्टॉकने 33% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. तर, गेल्या एका वर्षात स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 44% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. एनएसईवर स्टॉकची 52 आठवड्यांचा उच्चांक 777.50 रुपये आहे आणि नीचांक 501.55 रुपये आहे.

आता ब्रोकरेज हाऊस शेअरखान स्टेट बँक ऑफ इंडियाबाबत अतिशय पॉझिटीव्ही आहेत आणि त्यांनी बँकेसाठी नवीन टारगेट निश्चित केले आहे. एसबीआय येत्या काळात चांगला परतावा राखण्याची शक्यता आहे. यासोबत शेअरखानने स्टॉकला बाय रेटिंग दिले आहे आणि 915 रुपयांचे टारगेट दिले आहे.

SBI Share
UNO Minda Share : केवळ 89 हजारांचे 1 कोटी, कशी झाली ही कमाल ?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.