Share Market: शेअर बाजारात होणार मोठा बदल; सेबी घेणार AIची मदत, गुंतवणूकदारांना काय फायदा होणार?

Madhabi Puri Buch: जर तुम्ही शेअर मार्केट आणि IPO मध्ये गुंतवणूक करत असाल तर आता SEBI त्यासंबंधी काही बदल करणार आहे. शेअर बाजाराचे नियमन करणारी संस्था SEBI आता कंपन्यांना IPO साठी अर्ज करण्याचा एक सोपा मार्ग तयार करत आहे.
Sebi
Sebi working on AI-based processing of IPO Sakal
Updated on

Share Market: जर तुम्ही शेअर मार्केट आणि IPO मध्ये गुंतवणूक करत असाल तर आता SEBI त्यासंबंधी काही बदल करणार आहे. शेअर बाजाराचे नियमन करणारी संस्था SEBI आता कंपन्यांना IPO साठी अर्ज करण्याचा एक सोपा मार्ग तयार करत आहे.

नव्या पद्धतीत कंपन्यांना IPO फॉर्ममधील रिकाम्या जागेत संबंधित माहिती भरावी लागणार आहे. यामुळे गुंतवणूकदारांना कंपनीची माहिती समजणे सोपे होईल आणि सेबीलाही सध्याच्या तुलनेत तपासासाठी कमी वेळ लागेल.

एआयची मदत घेणार

याशिवाय सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांनी सांगितले की, सेबी आयपीओच्या मंजुरीसाठी एआयची मदत घेण्याची तयारी करत आहे. सेबी असा फॉर्म तयार करत आहे, जो आयपीओची तयारी करणाऱ्या कंपन्यांना भरावा लागेल.

यामुळे IPO मंजूर होण्यासाठी कमी वेळ लागेल आणि गुंतवणूकदारांना कंपनीबद्दल माहिती समजणे सोपे होईल. नवीन फॉर्ममध्ये कंपन्यांना ऑफरशी संबंधित गुंतागुंतीच्या गोष्टी सहज समजावून सांगण्यासाठी जागा दिली जाईल.

Sebi
Gold Bond: गोल्ड बाँडमधील गुंतवणूक 8 वर्षांत झाली दुप्पट; 5 ऑगस्टला होणार पेमेंट, खात्यात किती पैसे येणार?

अनेक कंपन्यांनी सेबीकडे आयपीओसाठी अर्ज केले

सेबी प्रमुख म्हणाल्या की, नवीन फॉर्म समजून घेणे खूप सोपे आहे. उद्योग संघटना फिक्कीच्या एका कार्यक्रमात सेबी प्रमुखांनी ही माहिती दिली. सध्या अनेक कंपन्यांनी आयपीओसाठी सेबीकडे अर्ज केले आहेत.

या कंपन्यांना बाजारातून एकूण 80,000 कोटी रुपये उभे करायचे आहेत. अनेक अर्जांमुळे SEBI ला आपली इतर कामे थांबवून आपल्या कर्मचाऱ्यांना IPO संबंधित कामावर लक्ष केंद्रित करावे लागते.

Sebi
Zerodha: सरकारने नितीन कामथ यांच्यासह कंपनीतील बड्या अधिकाऱ्यांवर केली कारवाई; काय आहे कारण?

सेबी देखील अशा प्रक्रियेवर काम करत आहे, ज्यामुळे कंपन्यांना शेअर बाजारात पैसा उभा करण्यासाठी दोन प्रकारच्या मंजुरी घेण्याची गरज भासणार नाही. सध्या, कंपन्यांना 'राइट्स इश्यू' आणि 'प्रेफरेंशियल इश्यू'साठी स्वतंत्र मंजुरी घ्यावी लागते.

आता सेबीची इच्छा आहे की संपूर्ण माहिती एकाच फॉर्ममध्ये उपलब्ध असावी आणि त्याला मंजुरी मिळण्यासाठी कमी वेळ लागेल. यामुळे कंपन्यांचे पैसेही वाचतील कारण त्यांना कमी मध्यस्थांची गरज भासेल.

SEBI ने IPO प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अनेक नवीन मार्ग आणले आहेत. माधबी पुरी बुच म्हणाल्या की, देशाचा शेअर बाजार सुरक्षित ठेवण्यासाठी केवायसीची कसून तपासणी करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.