Share Market Closing: विक्रमी उच्चांकानंतर शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 73,900 वर बंद, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Today: मंगळवारी शेअर बाजारात घसरण दिसून आली. कमकुवत जागतिक संकेतांमुळे ही घसरण झाली. सेन्सेक्स 73,903 आणि निफ्टी 22,453 वर बंद झाला. बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील विक्रीमुळे बाजारात दबाव होता.
Sensex breaks 3-day winning run, ends 111 pts lower; Nifty below 22,500; Tanla soars
Sensex breaks 3-day winning run, ends 111 pts lower; Nifty below 22,500; Tanla soars Sakal
Updated on

Share Market Closing Latest Update 2 April 2024: मंगळवारी शेअर बाजारात घसरण दिसून आली. कमकुवत जागतिक संकेतांमुळे ही घसरण झाली. सेन्सेक्स 73,903 आणि निफ्टी 22,453 वर बंद झाला. बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील विक्रीमुळे बाजारात दबाव होता. तर ऑटो आणि मेटलमध्ये खरेदी झाली.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

शेअर बाजारातील निर्देशांकांमध्ये निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी ऑटो आणि निफ्टी एफएमसीजी वाढीसह बंद झाले तर निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी फार्मा आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांक घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing
Share Market ClosingSakal

कोणते शेअर्स वाढले?

मंगळवारी शेअर बाजारात टाटा कंझ्युमर, महिंद्रा, बजाज ऑटो, बीपीसीएल, अदानी पोर्ट्स, डिव्हिस लॅब आणि नेस्ले इंडियाच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर हिरो मोटोकॉर्प, कोटक बँक, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय लाईफ, इन्फोसिस आणि टीसीएसच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

Sensex breaks 3-day winning run, ends 111 pts lower; Nifty below 22,500; Tanla soars
2000 Rupee Notes: दोन हजार रुपयांच्या ९७.६९ टक्के नोटा परत; ८,२०२ कोटी रुपयांच्या नोटा येणे बाकी
Share Market Closing
Share Market ClosingSakal

मंगळवारी अदानी पोर्ट्सचे शेअर्स 3 टक्क्यांनी वाढले आणि 1,424.95 रुपयांच्या पातळीवर पोहोचले. शेअरने 52 आठवड्यांची उच्च पातळी गाठली आहे. अदानी पोर्ट्सचे शेअर्स गेल्या 8 ट्रेडिंग सत्रांमध्ये वधारत आहेत.

S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEXSakal

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.50 लाख कोटी रुपयांची वाढ

सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले असले तरी शेअर बाजाराच्या बाजार भांडवलात मोठी वाढ झाली आहे. BSE वर कंपन्यांचे मार्केट कॅप 395.67 लाख कोटी रुपयांवर बंद झाले. तर शेवटच्या सत्रात मार्केट कॅप 393.15 लाख कोटी रुपये होते. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.52 लाख कोटी रुपयांची वाढ दिसून आली.

Sensex breaks 3-day winning run, ends 111 pts lower; Nifty below 22,500; Tanla soars
Job Security: जगभरात कर्मचारी कपातीचे संकट; मात्र 'या' क्षेत्रांमधील नोकऱ्या आहेत सुरक्षित

हिंदुस्थान झिंकमध्येही वाढ

शेअर बाजारात गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये हिंदुस्तान झिंक, ओएनजीसी, एनटीपीसी आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर ॲक्सिस बँक, टीसीएस, विप्रो, इन्फोसिस, एचसीएल टेक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.