Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात, सेन्सेक्सने 72300चा टप्पा केला पार, PSU शेअर्समध्ये जोरदार खरेदी

Share Market Opening: गुरुवारी शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली. प्रमुख बाजार निर्देशांक तेजीसह उघडले. 200 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 72,350 वर पोहोचला आहे. निफ्टी देखील 22000 च्या जवळ व्यवहार करत आहे.
Sensex crosses 72300 mark, strong buying in PSU shares
Sensex crosses 72300 mark, strong buying in PSU shares Sakal
Updated on

Share Market Opening Latest Update 8 February 2024: गुरुवारी शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली. प्रमुख बाजार निर्देशांक तेजीसह उघडले. 200 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 72,350 वर पोहोचला आहे. निफ्टी देखील 22000 च्या जवळ व्यवहार करत आहे. बाजारात सर्वाधिक खरेदी सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये होत आहे. एनटीपीसी, पॉवर ग्रिड, एसबीआय हे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकात वाढ झाली. गुरुवारी, पुन्हा एकदा एसबीआय, ग्रासिम इंडस्ट्रीज, जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्स वधारत होते तर एचडीएफसी लाईफचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते. निफ्टी एफएमसीजी निर्देशांक गुरुवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात घसरणीसह व्यवहार करत होता.

Sensex crosses 72300 mark, strong buying in PSU shares
HDFC Bank: HDFC बँकेने घर, कार आणि पर्सनल लोन केले महाग, जाणून घ्या किती वाढले व्याजदर
शेअर बाजारात जोरदार खरेदी
शेअर बाजारात जोरदार खरेदी Sakal

कोणते शेअर्स वाढले?

आज शेअर बाजारात वाढ झालेल्या शेअर्समध्ये ट्रेंट, गो फॅशन, एंजेल वन, विजय डायग्नोस्टिक आणि चंबल फर्टिलायझर या शेअर्सचा समावेश होता. स्टॉक मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जस्ट डायल, कॅप्री ग्लोबल, एस्कॉर्ट्स, ग्लेनमार्क फार्मा, पिरामल फार्मा आणि केपीआर मिल्सच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

कोणते शेअर्स वाढले?
कोणते शेअर्स वाढले?Sakal

रिझर्व्ह बँकेचे पतधोरण

रिझर्व्ह बँकेचे पतधोरण आज गुरुवारी जाहीर होणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या विधानावर शेअर बाजाराचा कल अवलंबून राहणार आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या आठवड्यातील महत्त्वाच्या घडामोडींमध्ये रिझर्व्ह बँकेचे चलनविषयक धोरण हे शेअर बाजाराचा कल निश्चित करणार आहे.

Sensex crosses 72300 mark, strong buying in PSU shares
RBI MPC Meeting: तुमच्या कर्जाचा EMI कमी झाला की वाढला? रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्याजदर कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे परंतु आरबीआयने केलेले भाष्य देशभर आणि जगभर बारकाईने पाहिले जाईल आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कपात करण्याबाबत काही विधान करतात की नाही यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.