Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार वाढ; सेन्सेक्स 72,000 च्या वर बंद, IT शेअर्स चमकले

Share Market Closing: शुक्रवारी शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. बाजारातील प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 178 अंकांनी वाढून 72,026 वर बंद झाला, जो इंट्राडेमध्ये 71,779 वर घसरला होता.
Sensex ends 179 up, Nifty above 21700; IT stocks rebound
Sensex ends 179 up, Nifty above 21700; IT stocks rebound Sakal
Updated on

Share Market Closing Latest Update 5 January 2024: शुक्रवारी शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. बाजारातील प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 178 अंकांनी वाढून 72,026 वर बंद झाला, जो इंट्राडेमध्ये 71,779 वर घसरला होता. निफ्टीही दिवसाच्या 21,629 च्या नीचांकीवरून सावरला आणि 21,710 वर बंद झाला. बाजारात सर्वाधिक खरेदी आयटी शेअर्समध्ये झाली.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात सर्वात जास्त वाढ आयटी शेअर्समध्ये दिसून आली. याशिवाय ऑटो, एनर्जी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑइल आणि गॅस सेक्टर्सचे शेअर्स वाढीसह बंद झाले. बँकिंग, फार्मा, एफएमसीजी, मेटल, आरोग्य सेवा क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले.

मिडकॅप इंडेक्स आणि स्मॉलकॅप इंडेक्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 18 शेअर्स वाढीसह आणि 12 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 25 शेअर्स वाढीसह आणि 25 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

अदानी पोर्ट्स, टीसीएस, एलएनटी आणि एलटीआय माइंड ट्रीचे शेअर्स वाढीसह बंद झाले तर ब्रिटानिया, यूपीएल, नेस्ले आणि जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्स घसरले.

शुक्रवारी शेअर बाजाराच्या व्यवहारात नेस्ले, बीसीएल इंडस्ट्रीज, कम्बाउंड केमिकल आणि कजारिया सिरॅमिक्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर बंधन बँक आणि आशानिषा इंडस्ट्रीजचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Sensex ends 179 up, Nifty above 21700; IT stocks rebound
Robert Kiyosaki: 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकावर 1 अब्ज डॉलरचे कर्ज; म्हणाले, मी दिवाळखोर झालो तर...

आज शेअर बाजारात ब्रँड कॉन्सेप्ट, एक्साइड, जिओ फायनान्शिअल, ग्लोबस स्पिरिट, आयसीआयसीआय बँक, स्टोव्ह क्राफ्ट, पटेल इंजिनीअरिंग, कामधेनू लिमिटेड या कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले तर एचडीएफसी लाईफ, महिंद्रा अँड महिंद्रा, युनिपार्ट्स, टाटा मोटर्स, देवयानी इंटरनॅशनल आणि ओम इन्फ्रा चे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

अदानी समूहाच्या नऊ कंपन्यांपैकी तीन कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले तर सहा शेअर्स घसरणीसह बंद झाले. अदानी टोटल गॅसमध्ये सर्वाधिक घसरण 2.34 टक्के होती तर अदानी पोर्ट्स 2.65 टक्के वाढीसह बंद झाला.

Sensex ends 179 up, Nifty above 21700; IT stocks rebound
GDP: भारताची अर्थव्यवस्था चीनपेक्षा चांगल्या स्थितीत; संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला विश्वास

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 80,000 कोटी रुपयांची वाढ

बाजारातील तेजीमुळे बीएसईवरील मार्केट कॅप विक्रमी उच्चांकावर बंद झाले आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, कंपन्यांचे मार्केट कॅप 369.23 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहेत, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 368.43 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात बाजार भांडवलात 80,000 कोटी रुपयांची वाढ दिसून आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.