Share Market Closing: शेअर बाजारात विक्री; सेन्सेक्स 790 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 6.22 लाख कोटींचे नुकसान

Share Market Today: आज शेअर बाजारात जोरदार प्रॉफिट बुकिंग झाले. सपाट सुरुवात झाल्यानंतर प्रमुख बाजार निर्देशांक घसरले. सेन्सेक्स सुमारे 790 अंकांनी घसरला आणि 72,500 च्या जवळ बंद झाला. निफ्टीही 200 अंकांनी घसरून 22000 च्या खाली बंद झाला.
Nifty 50, Sensex see deep cuts as investors lose
Nifty 50, Sensex see deep cuts as investors loseSakal
Updated on

Share Market Closing Latest Update 28 February 2024: आज शेअर बाजारात जोरदार प्रॉफिट बुकिंग झाले. सपाट सुरुवात झाल्यानंतर प्रमुख बाजार निर्देशांक घसरले. सेन्सेक्स सुमारे 790 अंकांनी घसरला आणि 72,500 च्या जवळ बंद झाला. निफ्टीही 200 अंकांनी घसरून 22000 च्या खाली बंद झाला. सर्वात मोठी घसरण ऑटो, मेटल आणि पीएसयू बँकिंग क्षेत्रात दिसून आली. बजाज ऑटो आणि अपोलो हॉस्पिटल्स प्रत्येकी 3% घसरले आहेत.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात सर्वात मोठी घसरण ऊर्जा शेअर्समध्ये दिसून आली. निफ्टीचा ऊर्जा निर्देशांक 2.30 टक्क्यांनी घसरला आहे. बँकिंग निर्देशांकही 1.34 टक्क्यांनी घसरला. याशिवाय ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, मेटल, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing
Share Market ClosingSakal

आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्री झाली. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 952 अंकांनी तर स्मॉल कॅप निर्देशांक 302 अंकांनी घसरून बंद झाला.

पेटीएमचे शेअर्स बुधवारी 5 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. अदानी समूहाच्या सर्व 10 कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. अदानी एनर्जी सोल्युशन्सचे शेअर्स 4.52 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले तर अदानी विल्मर 1.55 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEXSakal
Nifty 50, Sensex see deep cuts as investors lose
Baba Ramdev: सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय अन् रामदेव बाबांचे 2,300 कोटींचे नुकसान; काय आहे प्रकरण?

कोणते शेअर्स घसरले?

बुधवारी शेअर बाजारातील व्यवहारादरम्यान पॉवर ग्रिड, अपोलो हॉस्पिटल, आयशर मोटर्स, इंडसइंड बँक, मारुती सुझुकी, बजाज ऑटो आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांचे शेअर्स टॉप लूजर्सच्या यादीत होते.

एचयूएल, इन्फोसिस, टीसीएस आणि भारती एअरटेलच्या शेअर्सचा शेअर बाजारातील टॉप गेनर्सच्या यादीत समावेश होता. डॉ रेड्डीज लॅब, सन फार्मा, टाटा मोटर्स, सिप्ला, टाटा कंझ्युमर आणि पॉवर ग्रिडचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकाच्या जवळ व्यवहार करत होते.

Nifty 50, Sensex see deep cuts as investors lose
Nita Ambani: मनोरंजन क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपनीचे नेतृत्व करणार नीता अंबानी? मिळू शकते मोठी जबाबदारी

गुंतवणूकदारांचे 6.22 लाख कोटी रुपयांचे नुकसान

आजच्या सत्रात भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला तर मार्केट कॅपमध्ये मागील सत्राच्या तुलनेत मोठी घसरण दिसून आली. बीएसईवर कंपन्यांच्या मार्केट कॅप 385.75 लाख कोटींवर आले आहे. जे मागील सत्रात 391.97 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात मार्केट कॅपमध्ये 6.22 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.