Share Market Closing: शेअर बाजारात आठवड्याची दमदार सुरुवात; सेन्सेक्स 73,872वर बंद, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Today: सोमवारी शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 66 अंकांनी वाढून 73,872 वर पोहोचला. निफ्टीनेही 61 अंकांची उसळी घेतली आणि 22,400 वर बंद झाला.
Sensex, Nifty 50
Sensex, Nifty 50Sakal
Updated on

Share Market Closing Latest Update 4 March 2024: सोमवारी शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 66 अंकांनी वाढून 73,872 वर पोहोचला. निफ्टीनेही 61 अंकांची उसळी घेतली आणि 22,400 वर बंद झाला. तर इंट्राडेमध्ये निफ्टीने 22,440 चा विक्रमी उच्चांक गाठला.

बाजारात सर्वाधिक खरेदी बँकिंग आणि वित्तीय शेअर्समध्ये झाली, तर विक्री आयटी, एफएमसीजी आणि मीडिया शेअर्समध्ये झाली.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात बँकिंग, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, फार्मा, ऊर्जा, इन्फ्रा, कमोडिटीज आणि तेल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले तर एफएमसीजी, मेटल, मीडिया, आयटी आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Sensex, Nifty 50
PLI Scheme: सॅमसंग, टाटासह 'या' कंपन्यांना होणार फायदा; मोदी सरकार देणार हजारो कोटींचा निधी, काय आहे कारण?

मिडकॅप शेअर्स तेजीत राहिले तर स्मॉल कॅप शेअर्स घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 14 शेअर्स वाढीसह आणि 16 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 24 शेअर्स वाढीसह बंद झाले आणि 26 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

कोणते शेअर्स घसरले?

शेअर बाजारात एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक आणि पॉवर ग्रिडचे शेअर्स वधारले. तर टाटा स्टील आणि एसबीआयचे शेअर घसरले.

Sensex, Nifty 50
Bank Employees: बँक कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट! आठवड्यात 5 दिवस काम अन् पगारात होणार वाढ?

बजाज ऑटो, डॉ. रेड्डीज आणि एचडीएफसी लाईफचे शेअर्सही वधारले. महिंद्रा, ब्रिटानिया, अपोलो हॉस्पिटल आणि एलटीआय माइंड ट्री यांचे शेअर्स घसरले. एनटीपीसी, पॉवर ग्रिड, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, अदानी पोर्ट्स, टाटा मोटर्स आणि टाटा कंझ्युमर यांचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर होते.

गुंतवणूकदारांचे 31,000 कोटी रुपयांचे नुकसान

BSE वर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 4 मार्च रोजी 393.69 लाख कोटी रुपयांवर आले आहे, जे त्याच्या मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजेच शनिवारी 2 मार्च रोजी 394 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 31,000 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 31,000 कोटी रुपयांची घट झाली आहे.

अदानी पोर्टचा शेअर विक्रमी उच्चांकावर

सोमवारी अदानी पोर्ट्सच्या शेअर्सनी 1,356.55 चा विक्रमी उच्चांक गाठला. शेअर 1.36% वाढून इंट्राडे रु. 1,356.55 च्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ फेब्रुवारीच्या बिझनेस अपडेटनंतर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.