Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 271 अंकांच्या वाढीसह बंद, कोणते शेअर्स चमकले?

Share Market Closing: बुधवारी शेअर बाजारात वाढ दिसून आली. बाजारातील प्रमुख निर्देशांकांमध्ये जवळपास अर्धा टक्का तेजी होती. सेन्सेक्स 271 अंकांनी वाढून 71,657 वर बंद झाला, जो इंट्राडे 71,110 वर घसरला होता.
Sensex, Nifty 50 end higher led by IT, metal stocks
Sensex, Nifty 50 end higher led by IT, metal stocks Sakal
Updated on

Share Market Closing Latest Update 10 January 2024: बुधवारी शेअर बाजारात वाढ दिसून आली. बाजारातील प्रमुख निर्देशांकांमध्ये जवळपास अर्धा टक्का तेजी होती. सेन्सेक्स 271 अंकांनी वाढून 71,657 वर बंद झाला, जो इंट्राडेमध्ये 71,110 वर घसरला होता. निफ्टी 21,618 वर बंद झाला. बाजारात आरआयएल, आयटी आणि मेटल शेअर्समध्ये खरेदी झाली.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, मेटल्स, मीडिया, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले. एफएमसीजी, रिअल इस्टेटमधील शेअर्स घसरणीसह बंद झाले.

आजच्या व्यवहारात मिडकॅप शेअर्स वाढीसह बंद झाले तर स्मॉलकॅप शेअर्स घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 14 शेअर्स वाढीसह आणि 16 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 28 शेअर्स वाढीसह आणि 22 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

शेअर बाजारात घसरण झालेल्या शेअर्समध्ये ओएनजीसी, डिव्हिस लॅब, एनटीपीसी आणि बीपीसीएलच्या शेअर्सचा समावेश होता. अदानी समूहाच्या 10 पैकी 8 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर एसीसी लिमिटेड आणि अदानी विल्मारचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Sensex, Nifty 50 end higher led by IT, metal stocks
World Bank: जागतिक अर्थव्यवस्था आणखी मंदावेल, पण भारताचा वेग कायम राहील, जागतिक बँकेचा अंदाज

शेअर बाजारात मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये गार्डन रीच शिप बिल्डर, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयआरसीटीसी, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, एसबीआय कार्ड, एचडीएफसी बँक, फेडरल बँक आणि देवयानी इंटरनॅशनल यांचे शेअर्स वधारले.

तर मारुती सुझुकी, मुथूट फायनान्स, इन्फोसिस, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, पतंजली फूड्स आणि गरवारे टेक्निकल फायबर्समध्ये घसरण झाली.

Sensex, Nifty 50 end higher led by IT, metal stocks
रिलायन्स ही गुजराती कंपनी होती आणि भविष्यातही गुजराती कंपनी राहील; मुकेश अंबानींचे वक्तव्य चर्चेत

गुंतवणूकदारांना 1.39 लाख कोटींचा नफा

BSE वर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 10 जानेवारी रोजी वाढून 368.86 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे मंगळवारी 9 जानेवारी रोजी 367.47 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.39 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.39 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()