Share Market Opening: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स 100 अंकांनी खाली, कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Opening: बुधवारी शेअर बाजार घसरला. संमिश्र जागतिक संकेतांचा परिणाम बाजारावर दिसत आहे. प्रमुख निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स जवळपास 70,200 च्या पातळीवर घसरला. निफ्टीही 21200 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.
Sensex, Nifty flat
Sensex, Nifty flat Sakal
Updated on

Share Market Opening Latest Update 24 January 2024: बुधवारी शेअर बाजार घसरला. संमिश्र जागतिक संकेतांचा परिणाम बाजारावर दिसत आहे. प्रमुख निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स जवळपास 70,200 च्या पातळीवर घसरला. निफ्टीही 21200 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. बँकिंग, ऑटो आणि रियल्टी क्षेत्रात सर्वाधिक विक्री होत आहे. तर मीडिया शेअर्समध्ये खरेदी होत आहे.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिडकॅप 100 आणि निफ्टी बँक निर्देशांकात घसरण होती, तर बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी आयटी निर्देशांक किंचित वाढीसह व्यवहार करत होते. आज सिप्ला, सन फार्मा, भारती एअरटेल आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स घसरले होते, तर इंडसइंड बँक, कोल इंडिया, ओएनजीसी आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स वधारत होते.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती
क्षेत्रीय निर्देशांकाची स्थितीSakal

कोणते शेअर्स वाढले?

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात युनियन बँक ऑफ इंडिया, एचयूएल, एमआरपीएल आणि आरआयएलचे शेअर्स घसरत होते तर अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स किंचित वाढले होते.

गुंतवणूकदारांचा कल (BSE)
गुंतवणूकदारांचा कल (BSE)Sakal

शेअर बाजारातील सर्वाधिक नुकसान झालेल्या शेअर्समध्ये अॅक्सिस बँक, हिरो मोटोकॉर्प, एशियन पेंट्स, भारती एअरटेल, सिप्ला, मारुती सुझुकी आणि टाटा कंझ्युमर या कंपन्यांचे शेअर्स होते. वाढत्या शेअर्समध्ये इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्रा आणि हिंदाल्को या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होता.

कोणते शेअर्स वाढले?
कोणते शेअर्स वाढले?Sakal (S&P BSE SENSEX)
Sensex, Nifty flat
Budget 2024: अर्थसंकल्पात करदात्यांना मिळू शकतो दिलासा; जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ?

रेलिगेअर एंटरप्रायझेसमध्ये 5 टक्के वाढ

रेलिगेअर एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये 5% पेक्षा जास्त वाढ झाली. शेअर 5.07% वाढून रु. 228.05 च्या इंट्राडे उच्च पातळीवर पोहोचला. बर्मन कुटुंबीयांनी कंपनीतील 5.27 % भागभांडवल खरेदी करण्यास मान्यता दिल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे.

एंजल वनचे तांत्रिक विश्लेषक राजेश भोसले यांचे मार्केटबद्दलचे मत

एंजेल वनचे तांत्रिक विश्लेषक राजेश भोसले म्हणतात की, सध्या बाजार बिअरच्या नियंत्रणाखाली आहे, कारण कोणतीही किरकोळ तेजी आली की विक्रीचा दबाव बाजारावर येतो. अल्पावधीत बाजारात घसरण राहण्याची शक्यता आहे.

Sensex, Nifty flat
Multibagger Stock: 15 वर्षात गुंतवणूकदार झाले कोट्यधीश; आणखी तगड्या कमाईचा तज्ज्ञांना विश्वास

त्यांचा असा विश्वास आहे की महिन्याच्या शेवटी 21,000 च्या आसपास निफ्टीला मोठा आधार आहे. सध्याचा पॅटर्न लक्षात घेता, नजीकच्या काळात निफ्टी 20,800- 20,600 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.