Share Market Opening: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स 71,400च्या खाली, कोणत्या क्षेत्रात झाली विक्री?

Share Market Opening: बुधवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. मिश्र जागतिक संकेतांमुळे निर्देशांक थोड्या घसरणीसह उघडले. सेन्सेक्स 71400 च्या खाली घसरला आहे. निफ्टी देखील 21500 च्या खाली व्यवहार करत आहे.
Sensex, Nifty flat to lower on mixed global cues; Delta Corp slips 4 percent
Sensex, Nifty flat to lower on mixed global cues; Delta Corp slips 4 percent Sakal
Updated on

Share Market Opening Latest Update 10 January 2024: बुधवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. मिश्र जागतिक संकेतांमुळे निर्देशांक थोड्या घसरणीसह उघडले. सेन्सेक्स 71400 च्या खाली घसरला आहे. निफ्टी देखील 21500 च्या खाली व्यवहार करत आहे. बाजारात बँकिंग, ऑटो, मेटल आणि रियल्टी क्षेत्रात विक्री होत आहे.

आज निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी आयटी निर्देशांकात किंचित वाढ झाली तर निफ्टी बँक निर्देशांक घसरला. शेअर बाजारातील टॉप गेनर्समध्ये अदानी पोर्ट्स, अपोलो हॉस्पिटल आणि एसबीआय लाइफच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर हीरो मोटोकॉर्प, ब्रिटानिया आणि बजाज फिनसर्व्हच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

Sensex, Nifty flat to lower on mixed global cues; Delta Corp slips 4 percent
India-Maldive: भारत-मालदीव वादात 'या' कंपनीचे गुंतवणूकदार झाले मालामाल! शेअरने गाठला नवा उच्चांक

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात नेस्ले इंडिया आणि एशियन पेंट्सच्या शेअर्समध्येही किंचित वाढ झाली. वाढ झालेल्या शेअर्समध्ये अदानी समूहाच्या सर्व 10 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर एक टक्क्याने वाढला तर अदानी विल्मार किरकोळ वाढीसह व्यवहार करत आहे.

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये सर्वोटेक पॉवर सिस्टीम, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, पेटीएम, वॉक हार्ट, डीपी वायर्स, गल्फ ऑइल, आयआरईडीए, बीसीएल इंडस्ट्रीज, आयटीसी लिमिटेड, कॅम्बाउंड केमिकल्स यांचे शेअर्स वाढले तर पीएनबी, हजूर मल्टी प्रोजेक्ट्स, गेल, कजारिया सिरॅमिक्स, बंधन बँक, साऊथ इंडियन बँक आणि इंडियन ऑइलचे शेअर्स घसरले.

Sensex, Nifty flat to lower on mixed global cues; Delta Corp slips 4 percent
Twitch Layoff: जेफ बेझोस यांच्या कंपनीतील 500 कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! काय आहे कारण?

आशियाई-अमेरिकन बाजारातील स्थिती

आज सकाळी भारतीय बाजारापूर्वी उघडलेल्या आशियाई बाजारांमध्ये घसरणीचे संकेत दिसून येत होते. जपानचा निक्केई वगळता चीनचा शांघाय कंपोझिट, हाँगकाँगचा हँग सेंग, सिंगापूरचा स्ट्रेट्स टाइम्स आणि कोरियाचा कोस्पी या बाजारांमध्ये घसरणीसह व्यवहार झाले.

काल रात्री, अमेरिकन बाजारांमध्ये, Dow Jones आणि S&P 500 निर्देशांक घसरणीसह बंद झाले आणि Nasdaq किरकोळ वाढीसह बंद झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()