Share Market Opening: शेअर बाजार नव्या उच्चांकावर; सेन्सेक्सने पहिल्यांदाच पार केला 74,550चा टप्पा, कोणते शेअर्स वधारले?

Sensex-Nifty Today: सोमवारी शेअर बाजार नव्या विक्रमी पातळीवर उघडला. जागतिक संकेतांमुळे बाजार वाढीसह उघडले. सेन्सेक्सने प्रथमच 74,550 चा टप्पा पार केला. निफ्टीनेही 22,584 चा उच्चांक गाठला आहे.
Sensex, Nifty
Sensex, Nifty trade higher today Nifty above 22,550, Sensex near 72,500; Realty and Metal stocks leads the gain Sakal
Updated on

Share Market Opening Latest Update 8 April 2024 (Marathi News):

सोमवारी शेअर बाजार नव्या विक्रमी पातळीवर उघडला. जागतिक संकेतांमुळे बाजार वाढीसह उघडले. सेन्सेक्सने प्रथमच 74,550 चा टप्पा पार केला. निफ्टीनेही 22,584 चा उच्चांक गाठला आहे. बाजारात सर्वाधिक खरेदी मेटल आणि रियल्टी क्षेत्रात होत आहे. तर फार्मा क्षेत्रात सुधारणा आहे. निफ्टीमध्ये टाटा स्टील टॉप गेनर आहे.

Sensex Today
Sensex TodaySakal

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकात वाढ झाली.

Nifty Today
Nifty TodaySakal

कोणते शेअर्स तेजीत?

शेअर बाजारातील टॉप गेनर्सच्या यादीत कोटक बँक, एसबीआय लाईफ, एचडीएफसी बँक आणि बजाज फिनसर्व्हच्या शेअर्सचा समावेश आहे, तर टॉप लूजर्सच्या यादीत भारती एअरटेल, अपोलो हॉस्पिटल, आयसीआयसीआय बँक, डिवीज लॅब, आयशर मोटर्स यांचा समावेश आहे.

S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEXSakal

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये हिंदुस्थान झिंक, ॲक्सिस बँक, एशियन पेंट्स, टाटा कंझ्युमर, इन्फोसिस लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, एनटीपीसी लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, ओएनजीसी आणि एचसीएल टेक यांचे शेअर्स वधारले. विप्रो लिमिटेडचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.

Sensex, Nifty
Break Up Leave Policy: ब्रेकअपमधून सावरण्यासाठी मिळणार एक आठवड्याची सुट्टी; 'या' कंपनीने आणली नवी पॉलिसी

अदानी समूहाचे शेअर्स

शेअर बाजारातील तेजीच्या काळात अदानी समूहाच्या 9 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर अदानी पोर्ट्सचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवसायात किंचित घसरणीसह व्यवहार करत होते.

आशियाई बाजारातील तेजीचा परिणाम

सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात आशियाई शेअर बाजारात तेजी दिसून आली. शुक्रवारी भारतीय शेअर बाजार सलग तिसऱ्या आठवड्यात साप्ताहिक वाढीसह बंद झाला.

गेल्या आठवड्यात, भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या पतधोरण आढाव्यात दरांमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. आता कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीच्या निकालाचा परिणाम बाजारावर दिसू शकतो, असे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Sensex, Nifty
Milk prices: पाणीटंचाईमुळे दूध उत्पादनाला मोठा फटका; दुधाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता

आज शेअर बाजारात कोणते शेअर्स चर्चेत?

  • विप्रो: थियरी डेलापोर्ट यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीने श्रीनिवास पल्लिया यांची नवीन सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.

  • Vodafone Idea: कंपनी ओरियाना इन्व्हेस्टमेंटला शेअर्स देऊन 2,075 कोटी रुपये उभारेल. यासाठी 14.8/शेअर या दराने 139.5 कोटी शेअर्स घेतले जातील.

  • अदानी विल्मर: चौथ्या तिमाहीच्या अखेरीस कंपनीच्या 'खाद्य तेले आणि खाद्यपदार्थ' विभागामध्ये दुहेरी अंकी वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.