Share Market Opening: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; सेन्सेक्स 72,000 च्या वर, कोणते शेअर्स घसरले?

Share Market Opening: संमिश्र जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार सोमवारी सपाट उघडला. सेन्सेक्स 50 अंकांच्या वाढीसह 72000 च्या वर व्यवहार करत आहे. निफ्टी देखील 21750 च्या आसपास व्यवहार करत आहे. ऑटो, रियल्टी, मेटल आणि मीडिया क्षेत्रात बाजारात सर्वाधिक खरेदी होत आहे.
Share Market opening
Share Market opening Sakal
Updated on

Share Market Opening Latest Update 8 January 2024: संमिश्र जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार सोमवारी सपाट उघडला. सेन्सेक्स 50 अंकांच्या वाढीसह 72000 च्या वर व्यवहार करत आहे. निफ्टी देखील 21750 च्या आसपास व्यवहार करत आहे. ऑटो, रियल्टी, मेटल आणि मीडिया क्षेत्रात बाजारात सर्वाधिक खरेदी होत आहे.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी आयटी निर्देशांकात वाढ झाली तर निफ्टी बँक निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहेत.

अदानी पोर्ट्स, लार्सन अँड टुब्रो शेअर्समध्ये बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात वाढ दिसून आली, तर टीसीएस आणि एसबीआय लाईफचे शेअर्स घसरले होते.

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, निफ्टी तेजीसह व्यवहार करत आहे पण त्याला 21800-21850 च्या पातळीच्या पुढे जाण्यात अडचण येत आहे.

सोमवारच्या व्यवहारात शेअर बाजारातील तज्ज्ञांनी अनेक शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे, ज्यात सेंच्युरी टेक्सटाईल, टाटा स्टील आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सारख्या शेअर्सचा समावेश आहे.

सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात, अदानी समूहाच्या 10 शेअर्सपैकी पाच कंपन्यांचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते तर पाच कंपन्यांचे शेअर्स घसरले होते.

Share Market opening
Godrej Consumer Products Ltd : गोदरेज कन्‍झ्युमर प्रॉडक्ट्स

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये ब्रँड कॉन्सेप्ट, युनिपार्ट्स इंडिया, कामधेनू, जिओ फायनान्शियल, टाटा मोटर्स, स्टोव्ह क्राफ्ट, देवयानी इंटरनॅशनल, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी लाईफ यांचे शेअर्स वाढत आहे. तर नेस्ले इंडिया, एक्साइड इंडस्ट्रीज, ग्लोबस स्पिरिट आणि ओम इन्फ्रा यांचे शेअर्स घसरले.

Share Market opening
Tax Evasion: 29,273 बनावट कंपन्यांनी केली 44,000 कोटी रुपयांची करचोरी; 121 जणांना अटक

सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात, गेल, लाइफ इन्शुरन्स, डीपी वायर्स, वॉक हार्ट आणि पेटीएमच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली, तर साउथ इंडियन बँक, पीएनबी, आयटीसी, गल्फ ऑइल, बंधन बँक, आयआरईडीए आणि कंबाऊंडच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.