Shakti Pumps: शक्ती पंप्सच्या (Shakti Pumps India) शेअर्समध्ये सध्या चांगली वाढ दिसून येत आहे. याचे कारण कंपनीला हरियाणा रिन्युएबल एनर्जी विभागाकडून नवीन ऑर्डर मिळाली आहे. यामुळे गुंतवणूकदार शेअर्समध्ये खरेदी करताना दिसून येत आहेत. बीएसईवर हा शेअर 1010.20 रुपयांवर होता.
त्यात 8.6 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आणि त्याने 1090.20 रुपयांचा उच्चांक गाठला. तर एनएसईवर हा शेअर 1,020 वर होता. आता तो 1,093.95 रुपयांवर पोहोचला. गेल्या एका वर्षात शक्ती पंप्स इंडियाच्या शेअर्समध्ये सुमारे 144 टक्के वाढ झाली आहे.
शक्ती पंप्स (इंडिया) लिमिटेडला कुसुम-3 योजनेअंतर्गत हरयाणा रिन्युएबल एनर्जी विभागाकडून दुसरी ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर 6408 पंपांसाठी आहे. ऑर्डरची एकूण रक्कम जीएसटीसह अंदाजे 258 कोटी आहे. या ऑर्डरनुसार, कंपनी ऑर्डर दिल्यापासून 90 दिवसांच्या आत सोलर वॉटर पंपिंग सिस्टीमचा पुरवठा, इन्स्टॉलेशन करेल.
शक्ती पंप्स इंडिया शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक बीएसईवर 1224.65 रुपये आणि एनएसईवर 1,224.65 रुपये आहे. बीएसईवर 388.70 रुपये आणि एनएसईवर 388 रुपये आहे. बीएसईनुसार, कंपनीचे मार्केट कॅप सध्या 1917 कोटीपेक्षा जास्त आहे.
सप्टेंबर 2023 च्या अखेरीस, शक्ती पंप्स इंडियामध्ये प्रमोटर्सचा हिस्सा 56.22 टक्के आणि सार्वजनिक हिस्सा 43.78 टक्के होता. कंपनीने सप्टेंबर 2023 तिमाहीत 134.38 कोटीचा महसूल मिळवला होता, तर निव्वळ नफा 87 लाख होता. आर्थिक वर्ष 2023 मध्ये, कंपनीचा महसूल 923.36 कोटी होता आणि निव्वळ नफा 23.99 कोटी होता.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.